मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ही योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे. या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्याने या योजनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र या सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. इतकंच नाहीतर लाडकी बहीण योजनेत कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल करण्यात आली होती. नवी मुंबईतील एका सीएने लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा..
सेन्सेक्स २,५०० अंकांनी घसरला, निफ्टीतही घसरण
उत्तर प्रदेश बलात्कार प्रकरणात सामील असलेला राजू हा हिंदू नव्हे तर मुस्लिम…पोलिसांकडून स्पष्टीकरण
भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी !
मुस्लीम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने दिली ॲसिड हल्ल्याची धमकी
लाडकी बहीण योजना ही करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याने तिजोरीवर आर्थिक भार येत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायालयाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या समतावादी विचारांवर आधारित, कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवण्यासाठी, राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” कार्यान्वित करण्यात आली आहे.
केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक अभिनंदन, असे मत महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावरून व्यक्त केले आहे.