हॉटेल मालकांच्या लढ्याला यश

हॉटेल मालकांच्या लढ्याला यश

कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक झाली आहे. गेले अनेक आठवडे राज्यभरातले व्यापारी ठाकरे सरकारकडे मागणी करत होते, आंदोलनही करत होते. आज शेवटी ठाकरे सरकारला व्यापाऱ्यांच्या नुकसानाची जाणीव झाल्याचं चित्र आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत होते. त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. या निर्णयामुळे हॉटेल चालकांच्या लढ्याला यश आलं आहे. १५ ऑगस्टपासून हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहेत, असा निर्णय घेण्यात आलाय.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून हॉटेल चालकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कमी आसनक्षमतेच्या अटीसह हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळणार?

हेलिकॉप्टरचा पंखा लागून पायलटचा मृत्यू

राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विनेश फोगाटवर केली ‘ही’ मोठी कारवाई

तर दुसरीकडे मॉल्स आणि चित्रपटगृहे यांच्या बाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यासंदर्भातील कोणातही निर्णय अद्याप समोर आलेला नाही.

लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरु करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे.

Exit mobile version