‘चॅट जीपीटी’ला टक्कर देण्यासाठी लवकरच भारताचे स्वतःचे तंत्रज्ञान असणार आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी यासंबंधीची मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम हे भारत जीपीटीवर (Bharat GPT) काम करत आहे. हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्या सहाय्याने तयार करण्यात येत आहे. आयआयटी, मुंबईच्या वार्षिक टेकफास्ट या कार्यक्रमात आकाश अंबानी यांनी ही माहिती दिली आहे.
आकाश अंबानी यांनी जिओ 2.0 आणि त्यांच्या नवीन प्रकल्पाविषयीची माहिती दिली. रिलायन्स जिओने आयआयटी मुंबईसोबत समंजस्य करार केला आहे. generative AI तयार करणे आणि बहुभाषिक मॉडेल विकसीत करण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हे तंत्रज्ञान चॅट जीपीटी सारखे असणार आहे. ‘भारत जीपीटी’ या प्रकल्पाशिवाय आकाश अंबानी आणि त्यांची टीम अजून एका महत्वकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. हे एक टेलिव्हिजन तंत्रज्ञान आहे. त्यातंर्गत कंपनी स्वतःच्या टीव्हीसाठी एक ऑपेरिटिंग सिस्टिम तयार करत आहे.
हे ही वाचा:
रामलल्लाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ४० सूर्यस्तंभ झगमगणार!
इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीमध्ये बॉम्बवर्षाव!
डम्परला धडकून बस पेटली; १२ जणांचा होरपळून मृत्यू!
प्रियांका गांधी- वड्रा पती पत्नी ईडीच्या कचाट्यात
चॅट जीपीटी हे एक कृत्रिम बुद्धीमतेचे टूल आहे. हे एक चॅटबॉट आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यातून मिळतात. तसेच कंटेट लिहिण्यासाठीही उपयोगी ठरते. त्याच्या मदतीने समाज माध्यमांवर पोस्टपासून ते पत्र, लेख लिहण्यापर्यंत अनेक कामे करता येतात. एखाद्या विषयावरचे मुद्दे, त्याचे हेडिंग शोधण्याचे आणि त्यावर लिहिण्याचे काम हे तंत्रज्ञान करू शकते.