फडणवीस फॉर्म्युलाच चालला, पवार पॅटर्न ‘फेल’ !

भाजपाने ट्विट करत केली टीका

फडणवीस फॉर्म्युलाच चालला, पवार पॅटर्न ‘फेल’ !

विधान परिषदेच्या कालच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी झाले. ११ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. गुप्त पद्धतीने पार पडलेल्या निवणुकीत आमदार फुटून दगाबाजी होईल अशी सर्वांनाच भीती होती. मात्र, यामध्ये एक व्यक्ती शांत होती ती म्हणजे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस. महायुतीचे सर्व उमेदवार निवडणूक येतील असे निवडणुकीच्या सुरवातीलाच उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी सांगितले होते आणि ते खरे ठरले. विधान परिषदेच्या निवडणुकीत देवाभाऊ पॅटर्न लागू झाल्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली. यावरून भाजपने ट्विट करत यामागे देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर नेत्यांचा असलेला विश्वास आणि राजकीय गणिताची जादू म्हणजेच विजयी मॅजिक पॅटर्न कायम राहिल्याचे म्हटले आहे. तसेच शरदचंद्र पवार आपली विश्वासार्हता गमावून बसल्याचे भाजपने म्हटले आहे.

भाजपने ट्विट केलं की, महाराष्ट्राच्या राजकारणातील विश्वसनीय देवाभाऊ पॅटर्न… राज्यात झालेल्या दोन विधानपरिषद आणि राज्यसभा अशा तिन्ही निवडणूकीत शरद पवारांनी जे जे उमेदवार दिले, त्यांना त्यांच्याच नेत्यांकडून मत मिळाली नाही आणि ते निवडणूक हरले याचाच अर्थ शरदचंद्र पवार आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत. महाविकास आघाडीचे (स्वयंघोषित) नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांवर त्यांच्याच नेत्यांचा विश्वास नाही, हे एक वेळा नाही तर अनेक वेळा सिद्ध झाले काल त्याचीच पुनरावृत्ती झाली, यातून दोन गोष्टी सिद्ध झाल्या.

हे ही वाचा:

“काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान न वाटता ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने निकाल बदलला”

उबाठाचा ‘अजगर’ लहान पक्षांना गिळतोय !

संभाजीनगरमध्ये ‘इसिस’चे जाळे; ५० हून अधिक विद्यार्थी ‘व्हॉट्सऍप ग्रुप’ मॉडेलमध्ये अडकले

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून अज्ञातांकडून दगडफेक

एक म्हणजे महाविकास आघाडीचे भविष्य अंधारात आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही हे त्यांच्या सहकारी नेत्यांना लक्षात आले आहे. तर दुसरी म्हणजे विश्वासार्हता आणि शरद पवार या दोन विरुद्ध गोष्टी आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. आता जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्याच आघाडीवर विश्वास नाही तर जनतेने यांच्यावर विश्वास का ठेवावा? नेत्यांची विश्वासार्हता काय असते ते पाहायचं असेल तर या तिन्ही निवडणुकांचे निकाल पाहा जेवढे उमेदवार लढले तेवढे १००% स्ट्राईक निवडून आले. यामागे देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर नेत्यांचा असलेला विश्वास आणि राजकीय गणिताची जादू म्हणजेच विजयी मॅजिक पॅटर्न कायम राहिला.

Exit mobile version