कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने शनिवारी ८ जानेवारी रोजी नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि जीम खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, आता यामध्ये बदल करून सलून, ब्युटी पार्लर आणि जीम ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शनिवारी जारी केलेल्या नियमावलीत सरकारने सलून, ब्युटी पार्लर आणि जीम बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, याबाबत जीम, ब्युटी पार्लर मालकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारने नियमावलीत बदल करून ५० टक्के क्षमतेने सलून, ब्युटी पार्लर आणि जीम सुरू ठेवता येतील असे सांगितले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानातील मुरी येथे बर्फवृष्टीमुळे वाहनांत अडकून पर्यटक मृत्युमुखी
अजबच! ‘भाजपाशी लढण्यासाठी निवडणूक आयोगाने आम्हाला मदत करावी’
धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी
‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक
ब्युटी पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. तसेच फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक असणार आहे. जीमबाबतही अशीच नियमावली लागू करण्यात आली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नसून ते नियम तसेच लागू राहणार आहेत.