दिल्लीत ‘या’ कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता

दिल्लीत ‘या’ कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता

कोविड- १९ प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असताना, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) शुक्रवारी कोविड संबंधित अनेक प्रतिबंध शिथिल केले आहेत.

१३ जानेवारी रोजी दिल्लीत तब्बल २८ हजर ८६७ च्या विक्रमी रुग्णसंख्येनंतर कोविड- १९ रुग्णांची संख्या कमी होत  आहे. १४ जानेवारी रोजी ३० टक्क्यांचा पॉझिटीव्हीटी दर नोंदवला गेला होता, जो साथीच्या रोगाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान सर्वाधिक होता. तथापि, दहा दिवसांत प्रकरणे १० हजाराच्या खाली जाऊ लागली आहेत. काल, दिल्लीत गेल्या २४ तासांत २ हजार ६८८ नवीन कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे, शहरातील कोविड स्थितीत सुधारणा झाल्यामुळे, दिल्ली सरकारने शुक्रवारी रहिवाशांना दिलासा देत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक; व्हेंटिलेटरवर ठेवले

स्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने गुलाम नबी यांना केले ‘आझाद’

‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

त्यानुसार, कारमध्ये एकट्याने गाडी चालवणाऱ्याने मास्क न घातल्याबद्दल आता दंड द्यावा लागणार नाही. दिल्ली सरकारने यापूर्वी २८ जानेवारी रोजी विकेंड (शनिवार व रविवार) कर्फ्यू हटवला आहे. मात्र, इतर निर्बंध तसेच ठेवले आहेत. शुक्रवारी मात्र डीडीएमएने दिल्लीकरांसाठी बरीच सूट जाहीर केली आहे. उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १५ ते १८ वयोगटातील लोकांचे लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.

काही स्थानिकांनी सरकारला विनंती केली आहे की, कुटुंबसोबत प्रवास करणाऱ्या चालकांसाठी नो- मास्क ची सूट द्यावी. गेल्या वर्षी एप्रिल मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की, कोविड साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर एकच व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींनी वाहनामध्ये मास्क घालणे किंवा चेहरा झाकणे अनिवार्य आहे.

Exit mobile version