प्रसिद्ध मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे वृद्धापकाळामुळे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रविश्वाला धक्का बसला आहे.
माहेरची साडी, हळद रुसली कुंकू हसलं, मर्दानी, झुंज तुझी माझी, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, सोंगाड्या अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.
भालचंद्र कुलकर्णी यांनी चित्रपटविश्वात विविध भूमिका वठविल्या. ते चित्रपटात अभिनय तर करतच पण ते नाट्यकर्मीही होते. लेखक, लोककला अभ्यासक, दिग्दर्शक, गीतकार अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी चित्रसृष्टीची सेवा केली.
हे ही वाचा:
काँग्रेस आजचा नवा मुघल, मुघलांनी देश कमकुवत केला
भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?
वडिलांनी चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलेल्या मुलीसाठी गुजरात पोलीस आले धावून
वरुण गांधींकडून काही तरी शिका राहुल गांधी!
कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी साडेअकराच्या सुमारास काढली जाणार आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा स्मशानभूमीत दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
वयोमानपरत्वे भालचंद्र कुलकर्णी हे रुपेरी पडद्यापासून दूर होते. मात्र त्यांनी दिलेले योगदान अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पाच दशके त्यांनी मराठी चित्रसृष्टीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने रिझविली होती.