होळीचे फोटो शेअर केले आणि काहीवेळाने अभिनेते सतीश कौशिक यांचे प्राणोत्क्रमण

रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाही

होळीचे फोटो शेअर केले आणि काहीवेळाने अभिनेते सतीश कौशिक यांचे प्राणोत्क्रमण

बॉलीवूडमधून दुःखद बातमी आहे. मिस्टर इंडिया चित्रपटातून घराघरात पोहचलेले प्रसिद्ध अभिनेता सतीश कौशिक (६७) यांचे बुधवारी रात्री अचानक निधन झाले आहे. बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत्यूपूर्वी अभिनेत्याने होळीच्या सणावर खूप धमाल केली होती. त्याचे फोटोपण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

होळी खेळून झाल्यावर त्यांची तब्येत अचानक बिघडली. निधनापूर्वीचे सतीश कौशिक यांचे फोटो बघून बॉलीवूड चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल होण्यासोबतच त्यांचे शेवटचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सतीश कौशिक होळीच्या रंगांच्या मस्तीत मग्न झालेले दिसत आहेत.

अभिनेत्याचे शेवटचे हसणारे फोटो पाहून चाहते भावूक होताना दिसत आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी अभिनेता आणि त्यांचा मित्र अनुपम खेर यांनी दिली आहे. सतीश कौशिक यांचे ८ मार्च रोजी रात्री उशिरा गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात निधन झाले. होळीनंतर सतीश कौशिक यांची अचानक प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस

राऊतांची तर रोजच होळी, तीच बोंब तीच भांग

विधी मंडळ आहे ते, राणीची बाग नाही…

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

होळी खेळतानाचे शेवटचे फोटो व्हायरल

सतीश कौशिक यांनी होळीची धमाल करतांना ची काही छायाचित्रे ट्विटरवर शेवटची शेअर केली होती. या फोटोंमध्ये सतीश कौशिक जावेद अख्तर, रिचा चड्ढा आणि अली फैजलसोबत मस्तीच्या रंगात मग्न दिसत आहेत. जुहू येथील जानकी कुटीरमध्ये जावेद अख्तर, शबाना आझमी यांनी होळी पार्टी आयोजित केली होती. सगळ्यांना हसवणाऱ्या सतीश कौशिक यांना १९९० मध्ये त्यांचा मुलगा सानूच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला होता.

या दुःखातून मुक्त होण्यासाठी ते सतत आपल्याला कामात व्यस्त ठेवत. २०१२ मध्ये त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले की त्याच्या घरी मुलगी झाली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले- ‘आमच्या मुलीच्या जन्मामुळे मुलाची दीर्घ आणि वेदनादायक प्रतीक्षा संपली आहे.’ सतीश कौशिक यांनी आपल्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. रूप की रानी, चोरों का राजा सारख्या चित्रपटांचे उत्तम दिग्दर्शन केले होते.

Exit mobile version