28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
घरविशेषभारतीय मसाल्यांबाबतचे जगभरात असलेले आकर्षण पुन्हा निर्माण करा

भारतीय मसाल्यांबाबतचे जगभरात असलेले आकर्षण पुन्हा निर्माण करा

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन

Google News Follow

Related

मसाले भारताला एकजुट करतात. देशात मसाल्यांचे स्थान महत्त्वपूर्ण असून आपल्या व्यापारी शक्तीसोबतच समृद्ध पारंपरिक संस्कृती आणि वारसा ते प्रतिबिंबित करतात. भारतीय मसाल्यांबाबत जगभर असलेले जुने आकर्षण आपल्याला पुन्हा निर्माण करायचे आहे. भारत आता दुसऱ्या स्थानावर संतुष्ट राहू शकत नाही. आपल्याला मसाला उद्योगात जागतिक अग्रणी बनायचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केले. नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मसाला परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री गोयल यांच्या हस्ते २०१९-२० आणि २०२०-२१ साठी मसाले निर्यात उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा..

नवी मुंबई महापालिकेचा नवा विक्रम

२० लाखांच्या कथित लाचप्रकरणी सीबीआयकडून सात जण अटकेत

कर्मयोगी, सुदृढ नेतृत्व, लोककल्याणकारी अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा!

.संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने महाराष्ट्रातील सात कलावंतांना सन्मान

यावेळी बोलताना मंत्री गोयल म्हणाले, मसाला निर्यात वर्ष २०२३० पर्यंत १० अब्ज डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगातील भागधारकांनी एकत्रितपणे काम करावे. सध्याच्या बाजारपेठा विस्तारित करण्यासोबत वाढीव मूल्यवृध्दीच्या माध्यमातून नव्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी सर्वांनी आपली ऊर्जा केंद्रित करून एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे. जगभरात मसाल्यांचा वाढत्या वापराला चालना देण्यासाठी जगभरात पसरलेल्या ३५ दशलक्ष भारतीय वंशाच्या लोकांना ब्रँड अँबॅसिटर बनवावे, असेही गोयल यांनी सुचवले. मसाला उद्योगाला सर्वसमावेशकतेसाठी प्रयत्न करण्याचे आणि पर्याप्त उत्पादनासाठी शेतकर्‍यांना पाठबळ मिळेल, याकडे लक्ष पुरवण्याचे आवाहन गोयल यांनी मसाला उद्योगाला केले.

यावेळी सात वर्षांच्या कालावधीनंतर मसाला परिषद आयोजित केल्याबद्दल त्यांनी मसाले मंडळाचे अभिनंदन केले. येणाऱ्या २०२४ मध्ये दिल्लीमध्ये जागतिक दर्जाचे प्रदर्शन, परिसंवाद, परिषद आयोजित करावी असे आवाहन मंत्री गोयल यांनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा