२९ एप्रिल रोजी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे यशस्वी प्रशिक्षणानंतर पाच महिला अधिकारी रेजिमेंट ऑफ आर्टिलरीमध्ये सामील झाल्या आहेत. या तरुण महिला अधिकाऱ्यांची सर्व प्रकारच्या तोफखाना युनिटमध्ये नियुक्ती करण्यात आली असून तेथे त्यांना रॉकेट,मीडियम ,फिल्ड आणि आव्हानात्मक परिस्तिथीत उपकरणे हाताळण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रथमच पाच महिलांना अधिकाऱ्यांना तोफखाना रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
भारतीय लष्कराच्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये नियुक्त झालेल्या पाच महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीत रेखा सिंग आहेत.लेफ्टनंट रेखा सिंग शनिवारी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA ) मध्ये यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करात दाखल झाल्या. त्यांचे दिवंगत पती ,वीर चक्र (मरणोत्तर ) नाईक दीपक सिंग यांची गलवाण खोऱ्यातील संघर्षादरम्यान सर्वोच्च बलिदान दिले.
नाईक दीपक सिंग हे मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील फारुंदा गावचे रहिवासी होते. नाईक दीपक सिंग हे वयाच्या २१ व्या वर्षी २०१२ मध्ये लष्करात दाखल झाले. त्यांना आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये भरती करण्यात आले, जे युद्ध तसेच शांततेच्या काळात भारतीय सैन्याला वैद्यकीय सेवा पुरवते.काही वर्षे सेवा केल्यानंतर ३० नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांचा विवाह सुश्री रेखा सिंग यांच्याशी झाला. ३० जानेवारी २०१९ रोजी, नाईक दीपक सिंग हे लडाखमध्ये तैनात असलेल्या १६ बिहार बटालियनमध्ये तैनात झाले.
हे ही वाचा:
…तर बृजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार
युक्रेनच्या अनेक शहरांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांत २५ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले
महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले
ऑपरेशन स्नो लेपर्ड: १५ जून २०२०
जून २०२० मध्ये, ऑपरेशन स्नो लेपर्डचा एक भाग म्हणून नाईक दीपक सिंगची युनिट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आली होती. जूनच्या सुरुवातीपासून लेह ते दौलत बेग ओल्डीकडे जाणार्या रस्त्यालगत असलेल्या गलवान खोऱ्यातील बांधकामामुळे LAC वर तणाव निर्माण झाला होता. गलवान नदी ओलांडून अक्साई चिन परिसरात पूल बांधण्यास चिनी लोकांचा गंभीर आक्षेप होता. लेह ते दौलत बेग ओल्डी या भारतासाठी मोठे लष्करी महत्त्व असलेल्या हवाई पट्टीपर्यंतच्या रस्त्याचे वर्चस्व असल्याने भारत आणि चीनसाठी हे क्षेत्र सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या.
या भागात तैनात असलेल्या १६ बिहार बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांनी वाटाघाटीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चर्चेदरम्यान झालेल्या बाचाबाचीमुळे हाणामारी झाली. चिनी सैनिकांनी कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या माणसांवर प्राणघातक रॉडने हल्ला केल्याने या भांडणाचे लवकरच हिंसक चकमकीत रूपांतर झाले.चकमक वाढत असताना, नाईक दीपक सिंग आणि इतर सैनिक चिनी सैनिकांचा सामना करण्यासाठी अडचणीत सापडलेल्या भारतीय सैन्यात सामील झाले.अनेक तास ही चकमक चालली ज्यात एनके दीपकसह अनेक भारतीय जवान गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या सोबत १८ जवान शहीद झाले.
नायक दीपक सिंग यांना २६ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या असामान्य धैर्य, कर्तव्याची निष्ठा आणि सर्वोच्च बलिदानासाठी “वीर चक्र” हा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी श्रीमती रेखा सिंग यांनी त्यांच्या पतीचा वारसा पुढे नेत लष्कराचा गणवेश परिधान करण्याचा निर्णय घेतला आणि मे २०२० मध्ये प्रतिष्ठित OTA चेन्नईमध्ये सामील झाल्या.लेफ्टनंट रेखा सिंग यांनाही लडाखमध्ये पोस्टिंग मिळाली आहे.रेखा सिंग याना पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) फ्रंटलाईन तळावर तैनात करण्यात आले आहे. पाच महिला अधिकाऱ्यांपैकी तीन उत्तरेकडील सीमेवर तैनात असलेल्या तुकड्यांमध्ये आणि इतर दोन पश्चिमेकडील आव्हानात्मक ठिकाणी तैनात आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी तोफखान्यात महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला होता, ज्याला नंतर सरकारने मान्यता दिली.