चित्ता’कर्षक नावे; एल्टन झाला गौरव तर ओबानला नाव मिळाले पवन !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नावे सुचविण्याच्या केलेल्या विनंतीला भरघोस प्रतिसाद

चित्ता’कर्षक नावे; एल्टन झाला गौरव तर ओबानला नाव मिळाले पवन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये भारतात दाखल झालेल्या चित्त्यांसाठी नावे सुचविण्यास सांगितले होते, त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आता नव्या नावाने सगळे चित्ते ओळखले जाणार आहेत.

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका येथून मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलेल्या चित्त्यांना आता नवी नावे मिळाली आहेत.

नामिबियातून आणलेल्या अशा या मादी चित्त्याचे नाव आता आशा झाले आहे. सवानाची नाभा, तिबिलिसीची धात्री आणि चार पिल्लांना जन्म देणाऱ्या सियाचे नाव ज्वाला ठेवण्यात आले आहे. तर नर ओबानचे नाव पवन, एल्टनचे नाव गौरव आणि फ्रेडीचे नाव शौर्य ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील फिंडा गेम रिझर्व्हमधून आणलेल्या प्रौढ मादीचे नाव दक्षा, प्रौढ नरांपैकी एकाचे नाव वायु आणि दुसऱ्याचे अग्नी असे आहे. मापेसू रिझर्व्हमधून आणलेल्या मादीचे नाव नीरवा आहे. कलहारीच्या स्वॅलो रिझर्व्हमधून आणलेल्या प्रौढ मादीचे नाव गामिनी, अल्पवयीन प्रौढ वीरा, प्रौढ नर तेजस, अल्पवयीन प्रौढ नर सूरज असे नावे ठेवण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

पायलटने चक्क मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले, चौकशी सुरू

टीका भोवली.. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानात विकत आहे, विदेशी शस्त्रांच्या ‘फर्स्ट कॉपी’ अगदी स्वस्तात!

सावरकरांची बदनामी करण्याची काँग्रेसची मोहीम

चित्ता लोकप्रिय करण्यासाठी आणि सामान्य लोकांमध्ये या प्राण्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांच्या मन की बातमध्ये लोकांना चित्त्यांसाठी नावे सुचवण्यास सांगितले होते.
या संदर्भात, भारत सरकारच्या mygov.in या प्लॅटफॉर्मवर २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी सांगितले की, नाव सुचवण्यासाठी ११५६५ लोकांनी स्पर्धेत भाग घेतला. निवड समितीने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्यांची नावे सुचवलेल्या नावांमधून महत्त्व आणि प्रासंगिकतेच्या आधारावर नावांची निवड केली. वॉटरबर्ग रिझर्व्हमधून आणलेल्या प्रौढ मादीचे नाव धीरा, प्रौढ नर उदय, दुसरा प्रभास आणि तिसरा पावक आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने या स्पर्धेत नावे सुचविणाऱ्या विजेत्यांचे अभिनंदन केले. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी नामिबियातील एका चित्त्याचे नाव मोदींनी अशा ठेवले होते. आता तिचे नाव आशा असे ठेवण्यात आले आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानापासून जवळच असलेल्या माधव राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांचा सहवास आहे. नुकतेच ओबान तथा पवन नामक चित्त्याने माधव राष्ट्रीय उद्यानात प्रवेश केला असून हे त्यांचे दुसरे घर मानले जाते.

Exit mobile version