31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषमहिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या रेहमानला अटक

महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या रेहमानला अटक

Google News Follow

Related

उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडूनमधील दलानवाला पोलीस स्टेशनच्या परिसरात एका मुस्लीम समाजातील तरुणाने एका विवाहित महिलेला आपल्याशी मैत्री न केल्याबद्दल चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. याशिवाय तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. रहमान असे त्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ९ एप्रिल रोजी हा प्रकार घडला.

२८ मार्च रोजी विवाहित महिलेला व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून फक्त “हॅलो” असा संदेश आला. पाठवणाऱ्याची ओळख विचारली असता, त्या व्यक्तीने स्वतःची ओळख अमन अशी दिली. तो दुबईतील एका रेस्टॉरंटचा मालक आहे. अमनने तिचा मोबाईल नंबर तिच्या शेजाऱ्याच्या मुलाकडून मिळवल्याचा दावा केला. त्याने तिला सांगितले की आपण नुकतेच दुबईहून डेहराडूनला आला आहोत. यानंतर तो तिला त्याच्याशी मैत्री करण्यास भाग पाडू लागला, मात्र तिने त्याला नकार दिला.तिने नकार दिल्याने त्याने तिला त्याच्याशी बोलण्यास भाग पाडण्यासाठी हातातील नस कापून जीवे मारण्याची धमकी दिली. शेवटी ती कंटाळली आणि तिने तिच्या पतीला संपूर्ण प्रसंग सांगितली. त्यानंतर या जोडप्याने त्याला पकडण्यासाठी योजना आखली.

हेही वाचा..

“देशात असलेल्या मजबूत सरकारमुळे दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जात आहे”

हार्दिक आणि कुणाल पंड्याच्या सावत्र भावाला अटक!

केमोथेरपीनंतर महिलेचे केस गळले,त्वचा खराब झाली, नंतर कळले कर्करोग झालाच नाही!

“मविआने जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले नाही”

महिलेने त्याला सांगितले की ती त्याला भेटायला तयार आहे आणि त्या माणसाने तिला भेटण्यासाठी एक ठिकाण पाठवले. अमनने पाठवलेल्या ठिकाणी ती महिला पोहोचली. तिच्या जोडीदाराने थोड्या अंतरावर गाडीत बसवले आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्या माणसाला संभाषणात गुंतवून नंतर पोलिसांना बोलावण्याची त्यांची योजना होती. काही वेळाने तो त्याच्या मोटारसायकलवरून तेथे आला आणि त्याने सांगितले की आपले खरे नाव रेहमान आहे. मात्र मित्र त्याला अमन असे म्हणतात. त्याने बोलण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावूया असे सांगून दुचाकीवरून सोबत येण्यास सागितले. मात्र, महिलेने नकार दिल्याने रहमानला राग आला. त्याने तिचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला.

तिने प्रतिकार करणे सुरूच ठेवले असता त्याने खिशातून एक छोटीशी कुपी काढून ती ॲसिड असल्याचे सांगितले. तिने त्याचे ऐकले नाही तर ते तिच्या तोंडावर फेकण्याची धमकी दिली. हे ऐकून ती आरडाओरडा करू लागली त्यानंतर तिथे लक्ष ठेवून असलेला तिचा पती घटनास्थळी पोहोचला. आरोपीने दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या गोंधळात तिथे जमलेल्या लोकांनी त्या महिलेची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.पीडितेच्या म्हणण्यावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा