ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष आणि हैदराबाद लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या घरोघरी प्रचारादरम्यान वादाला तोंड फोडले. त्यांनी हैदराबादच्या जुन्या शहरातील ‘रेहान बीफ शॉप’ दुकानासमोर कसायाला ‘रेहान बीफ शॉप जिंदाबाद’ असे म्हटले.यावेळी त्यांनी दुकानात उपस्थित लोकांचे स्वागत करत त्यांच्याशी हस्तांदोलन केले. आपल्या समर्थकांसह तेथून निघताना ‘काट ते रहो (कत्तल करत रहा)’ असेही ते म्हणाले.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने याला आक्षेपार्ह ठरवून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर, औवेसी यांचे राजकीय वक्तव्य नेहमीच अतिरेकी आणि असभ्य असल्याने त्यांना धक्का बसला नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. त्यांचा भाऊ आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसीही तसाच आहे, असेही त्या म्हणाल्या.
भाजपच्या आंध्र प्रदेश युनिटचे उपाध्यक्ष विष्णू वर्धन रेड्डी यांनी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आणि हिंदूंच्या भावना भडकावण्यासाठी आणि दुखावण्यासाठी प्रक्षोभक शब्द वापरल्याचा आरोप खासदारावर केला.
“असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून फुटीरतावादी वक्तृत्वाचा एक धोकादायक नमुना समोर आला आहे. ते निर्लज्जपणे हिंदूंच्या भावना भडकावण्यासाठी आणि दुखावण्यासाठी प्रक्षोभक भाषा वापरत आहेत. ‘रेहान बीफ शॉप जिंदाबाद’ असे संबोधून बीफ शॉपला मान्यता देणे आणि हिंसेचे समर्थन करणे यांसह त्याच्या अलीकडील प्रचारातील कृत्ये घृणास्पद आहेत. अशा जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमुळे केवळ द्वेषाला खतपाणी मिळते आणि आपल्या समाजात तेढ निर्माण होते,’ असा आरोप रेड्डी यांनी केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, ओवेसीं यांना माधवी लता यांच्या रूपात एक प्रबळ विरोधक समोर आला आहे. माधवी लता यांना त्यांच्या कट्टर हिंदुत्व प्रतिमेसाठी ओळखले जाते. तसेच, कट्टरपंथी राजकारणाला तीव्र विरोध म्हणून त्यांना देशव्यापी मान्यता मिळत आहे. मतदारसंघ राखण्यासाठी ओवेसी कुटुंबीयांनी काल्पनिक मतदारांचा वापर केल्याचा आरोप माधवी यांनी केला. “असदुद्दीन ओवेसी बॅरिस्टर कसे झाले हे मला समजत नाही. ते वैयक्तिक कायद्याबाबत बोलतात. वैयक्तिक कायद्यानुसार, ‘फतवा’ अशी गोष्ट आहे जी सर्वांनी पाळली पाहिजे.
हे ही वाचा:
गाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू; बहीण जखमी!
भारतीय महिला कुस्तीपटूंची कामगिरी!
ईव्हीएममुळे जिंकलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ म्हणतात, ईव्हीएम शंकास्पद!
लॉरेन्स बिश्नोईच्या माणसाची खोटी माहिती देणाऱ्याला अटक
गोमांस खाऊ नये असा ‘फतवा’ असताना ते फतव्याच्या विरोधात कसे जातात? याचा अर्थ ते स्वतःच्या धर्माचा आदर करत नाहीत,’ असे त्या म्हणाल्या.‘मुस्लिमांचे आयुष्य इतके लहान आहे का की ते गोमांस कापून खाण्याभोवती फिरते? यावर तुम्ही मते मागत आहात? तो मुस्लिमांचे जीवन इतके लहान का करत आहेत? त्यांनी शिक्षण घेऊन देशासाठी काहीतरी बनण्याचे बोलले पाहिजे. गोमांस कापण्यात काय अर्थ आहे? त्याला मते मागण्यासाठी दुसरे काही मिळाले नाही का? ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब आहे,’ अशीही टीका त्यांनी केली.
असदुद्दीन ओवेसी यांना सन २०१६मध्ये पालिका निवडणुकीदरम्यान एआयएमआयएम सत्तेत नसल्यास बीफ मिळणार नाही, असे म्हटल्याने टीकेचा सामना करावा लागला होता. ‘जर एआयएमआयएम निवडणुकीत पराभूत झाले तर मी तुम्हाला सांगत आहे की अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना गोमांस खाणे विसरावे लागेल,’ असे ते म्हणाले होते. त्यांचा धाकटा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनीही १५ मिनिटांसाठी पोलिस हटवा आणि आम्ही १०० कोटी हिंदूंना संपवू’ असे विधान केले होते. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान अनेकदा केले आहे.