बिग बी अमिताभ बच्चन यांना चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी झालेल्या अपघातानंतर सर्व चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता लागली होती. गंभीर जखमी झाल्यानंतरही अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांना सुखाने शान होत नाहीये. सध्या मी आराम करत आहे पण मी लवकरच परतणार असल्याचा संदेश दिला होता. त्यानुसार आता बिग बी यांनी देशातील सर्वात लोकप्रिय गेम शोपैकी एक असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या १५ व्या हंगामाची नोंदणी सुरू झाली असल्याची घोषणा केली. कौन बनेगा आता लवकरच सुरु होणार या आनंद वार्ते बरोबरच आता बिग बी लवकरच हॉट सीट समोर कधी विराजमान होणार याची उत्सुकता लागली आहे.
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करून कौन बनेगा करोडपतीसाठी मी लवकरच येत असल्याचा संदेश दिला आहे. केबीसीची सुरुवात २००पासून झाली. तेव्हापासून आतापर्यंतच्या १४ हंगामामध्ये केबीसीच्या हॉटसीटवर प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन लोकांनी लाखो आणि करोडो रुपये जिंकले आहेत. आता १५ व्या हंगामाला लवकरच प्रारंभ होत आहे. ‘केबीसी १५ची नोंदणी २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून सुरू होत आहे असल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
सोनी टीव्हीने यासाठी एक प्रोमो टायर केला आहे. यामध्ये एक मुलगी बोगदा खोदून आत जात आहे. बोगद्याच्या आत खोदून ती थेट केबीसीच्या सेटवर बाहेर येते. अमिताभ बच्चन म्हणतात की असे कृत्य करण्याची कोणाला गरज नाही. तुम्हाला फक्त फोन उचलावा लागेल आणि केबीसी १५ साठी नोंदणी करावी लागेल असे सांगतात.
केबीसीच्या १४ व्या हंगामांमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खास एपिसोड साजरा करण्यात आला. या मोसमात आमिर खान, एम.सी. मेरी कोम, निखत जरीन, सुनील छेत्री, मिताली मधुमिता, मेजर डीपी सिंग सारखे सेलिब्रिटी हॉटसीटवर बसले होते.केबीसी १४च्या मोसमात अनेक नवीन नियम आणले गेले. त्यात ७५ लाख रुपयांचा धन अमृत प्रश्नही जोडला गेला. या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यानंतर, कोणताही स्पर्धकाला किमान ७५ लाख रुपये जिंकण्याची संधी होती.
हे ही वाचा:
मन की बात.. हा माझ्यासाठी श्रद्धा, उपासना, अहम ते वयमचा प्रवास!
एटीएम ते जीएसटी; महाराष्ट्र दिनापासून होणार चार मोठे बदल !
राजगडाच्या पायथ्याशी उभारणार जिजाऊंचे सुवर्ण मंदिर !
भिवंडीतील इमारत दुर्घटनेत बचावलेल्या मुलांची आईसाठी आर्त हाक
वयाची ऐन्शी गाठलेले अमिताभ बच्चन गेल्या २३ वर्षांपासून केबीसी होस्ट करत आहेत. फक्त २००७ मध्ये, तिसरा मोसम शाहरुख खानने होस्ट केला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना हैरीराबाद येथे आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बरगडीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत होती. पण अशातही आपल्याला लवकरात लवकर शूटिंगवर परतायचे अशी इच्छा व्यक्त केली होती. आता बिग बी प्रभास आणि दीपिका पदुकोणच्या चित्रपट प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत. नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील ते करत आहेत. करत आहेत.