१५-१८ वयोगटातील मुलांची १ जानेवारीपासून करा नोंदणी

१५-१८ वयोगटातील मुलांची १ जानेवारीपासून करा नोंदणी

कोरोना विरुद्धच्या लढाईला अधिक बळकटी देण्यासाठी आता १५-१८ वयोगटातील मुलांनाही लसीकरण करण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती. भारतात आता अल्पवयीन मुलांचेही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. या अल्पवयीन मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहितीही केंद्र सरकारने दिली आहे. लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया आधीच्या नोंदणीसारखीच असणार आहे.

लसीकरणासाठी अल्पवयीन मुलांची नोंदणी कोवीन ऍपद्वारे होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ.आर.एस. शर्मा यांनी सांगितले की, १ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.

हे ही वाचा:

पुण्यात ATM फोडले, १६ लाखांची चोरी

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं होतं.

Exit mobile version