१ जानेवारी २०२१ला ज्यांना १८ वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नाव नोंदविण्याची व्यवस्था केलेली आहे.
महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्याकरता आता निवडणूक विभागाने मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. ही मतदार यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य राहणार आहे. यामध्ये आता पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार म्हणून नोंदवावे.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये, १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकाला, त्याच्या संबंधीत विधानसभा मतदार यादीत आपले नाव नोंदविता येणार आहे. तसेच नाव व पत्त्यातील दुरुस्त्याही करणे, नावातील दुबार व समान नोंदी मतदार यादीमधून वगळणे, मृत व स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे तसेच याबाबत आक्षेप व दावेही दाखल करणे, ही सर्व कार्यवाही करता येणार आहे.
सर्व दावे व आक्षेप २० डिसेंबर पर्यंत निकाली काढण्यात येवून १ जानेवारी २०२२ रोजी या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी ५ जानेवारी, २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. हीच प्रसिद्ध अंतिम मतदार यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबईतील सर्व नागरिकांना या मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती व्हावी व अधिकाधिक प्रमाणात मतदार नोंदणी, नावातील दुरुस्त्या व्हाव्यात याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या माध्यमातून विविध माध्यमांचा उपयोग करुन मतदार नोंदणी जनजागृती करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
अवघ्या ४६व्या वर्षी पुनीत राजकुमारचे निधन
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि वानखेडे… काय आहे प्रकरण?
उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ
‘हा’ उद्योगपती करतो दिवसाला २७ कोटी दान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करुन संविधानिक कर्तव्य बजावून मतदानाची सरासरी टक्केवारी वाढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.