क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या रक्कमेत कपात

गृह विभागाचा निर्णय

क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या रक्कमेत कपात

महाराष्ट्र गृह विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या रक्कमेत कपात करण्यात आली आहे. मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नागपूर येथील सामन्यांसाठी आता समान रक्कम आकारली जाणार आहे. गृह विभागाकडून क्रिकेट सामन्यांच्या वेळी पोलीस संरक्षण पुरवलं जातं. यासाठी गृह विभाग आयोजकांकडून शुल्क आकारते. हे शुल्क गृह खात्याने कमी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नागपूर येथील सामन्यांसाठी आता एकच रक्कम आकारली जाणार आहे. क्रिकेट सामन्यांमध्ये संघाची लोकप्रियता आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सामन्याकरता आवश्यकतेनुसार विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. या पोलीस बंदोबस्तासाठी शासनाकडून पैसे आकारले जातात. हे दर कमी करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचा परिणाम गृह खात्यावर होऊ शकतो कारण सुरक्षेची रक्कम पोलीस मुख्यालयात जमा केली जाते.

मुंबईत टी- २० सामन्यांसाठी ७० लाख रुपयांऐवजी १० लाख रुपये आकारण्यात येणार आहेत. तर, नागपूर, पुणे, नवी मुंबईत टी- २० सामन्यांसाठी ५० लाखांऐवजी १० लाख रुपये आकारण्यात येणार. कसोटी सामन्यांसाठी ६० लाख रुपयांच्या ऐवजी २५ लाख रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी ७५ ते ५० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपये आकारण्यात येणार आहेत. परराज्यातील सामन्यांचे दर लक्षात घेत शासनाकडून शुल्कात कपात करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

दिल से बुरा लगता है… फेम देवराज पटेलचे अपघाती निधन; कोण आहे देवराज?

कंपासमधील ब्लेडने दर्शनावर वार नंतर दगडाने मारहाण

“माझी ड्युटी संपली…”, म्हणत वैमानिकाने दिल्लीच्या प्रवाशांना जयपूरलाच सोडलं!

सूरज चव्हाणचा, सुशांत सिंग राजपूत तर होणार नाही ना?

तसेच सामन्याच्या आयोजनाबाबत धमक्या आल्या तर अधिक पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल. त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल.

Exit mobile version