26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरविशेषरत्नागिरीतील ‘या’ झाडाची किंमत आहे तब्बल १०० कोटी!

रत्नागिरीतील ‘या’ झाडाची किंमत आहे तब्बल १०० कोटी!

Google News Follow

Related

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेल्या चाफवली गावातील देवराईमध्ये असलेल्या एका झाडाची किंमत तब्बल १०० कोटी इतकी आहे. तब्बल १५० वर्षे जुने हे झाड रत्नागिरीमध्ये कसे आले याबद्दल कोणालाच कसली कल्पना नाही.

देवराईमध्ये हे रक्तचंदनाचे झाड असून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगलीच मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याचा दर पाच ते सहा हजार रुपये किलो इतका आहे. रक्तचंदनाचे हे झाड प्रामुख्याने तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश राज्यातील चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांमध्ये आढळून येते. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, चीन या देशांमध्ये या झाडाला मोठी मागणी असून त्याची चांगली किंमत मिळते.

साधारण ३० ते ४० वर्षांपूर्वी गावामध्ये कातभट्टीचा व्यवसाय चालत असे. बैल आजारी पडला की कातकरी लोक या झाडाची साल उगाळून त्या बैलाला देत होते. त्यानंतर तो बैल ठणठणीत बरा होत असे. हे झाड औषधी असल्याने तोडायचे नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थ प्रकाश चाळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

हे ही वाचा:

काय आहे नार्कोटिक जिहाद?

दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

अमेरिकेतील मृतांचा आकडा पोहोचला सात लाखांवर

… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!

रक्तचंदनाचा उपयोग उच्च प्रतीची दारू, मूर्तीकलेसाठी आणि आयुर्वेदामध्ये सूज किंवा मुका मार लागल्यास केला जातो. पाच वर्षांपूर्वी या झाडाचा गर काढून संशोधन करण्यात आले, तेव्हा हे झाड रक्तचंदनाचे असल्याचे उघड झाले. या झाडाची उंची ३० मीटर असून झाडाचा घेरा १७ ते १८ फूट आहे. या झाडाच्या सुरक्षेसाठी देवरुख वन विभागाने विशेष लक्ष दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा