शिर्डीमध्ये रेड अलर्ट, अहमदनगरमध्ये कलम १४४ लागू

शिर्डीमध्ये रेड अलर्ट, अहमदनगरमध्ये कलम १४४ लागू

महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ शिर्डी येथे पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यावर शिर्डीमध्ये कडेकोट सुरक्षा करण्यात येत आहे. दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, अहमदनगरमध्येसुद्धा कलम १४४ लागू करण्यात आला आहे. शिर्डी, अहमनगरमध्ये प्रशासनाच्या वतीने काही ठोस पावले तातडीने उचलली गेली आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीमध्ये पोलिसांनी महत्वाचं पाऊल उचललं आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची आता कसून चौकशी केली जाणार आहे. ओळखपत्र न पाहता भाविकांना राहण्यासाठी रूम दिल्यास हॉटेल मालकावरही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अहमदनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती एसपी मनोज पाटील यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

“पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि आम्ही धनुष्यबाण जिंकू”

आज होणार राजपथचे कर्तव्यपथ

निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी

अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध

या नियमांचे गांभीर्य सांगताना एसपी मनोज पाटील म्हणाले, जे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर १८८ कलमानुसार कारवाई केली जणार आहे. सिम कार्ड विक्रेत्यांना देखील योग्य कागदपत्रांशिवाय सिम कार्ड दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जणार आहे. परिसरातील नागिरकांनी हालचालींवर बारीक लक्ष ठेवून काही संशायस्पद आढळल्यास याची माहिती त्वरित पोलीस प्रशासनाला कळवावी, असे आवाहन एसपी मनोज पाटील यांनी दिले आहे.

Exit mobile version