मुंबई पोलीस दलात अखेर तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीनं जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मुबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस कर्मचारी घेण्यात येणार असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या.हा विषय पावसाळी अधिवेशनातही गाजला होता.राज्याचे सरकार अनेक विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांना भरती करत आहे.त्यामुळे ठेकेदाराला अधिक नफा मिळत असून कर्मचाऱ्याला त्याचा रीतसर लाभ होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.पोलीस भरतीमध्ये सुद्धा कंत्राटी पोलीस भरती करण्यात येणार असल्याने विरोधक चांगलेच तापले होते.यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणारे हे जवान देखील पोलीस भरतीचे उमेदवार आहेत.ज्यांचे पोलीस भरतीमध्ये काही मार्कानी सिलेक्शन होत नाही ते जवान राज्य सुरक्षा महामंडळात ( MSF) समाविष्ट केले जातात.कंत्राटी पद्धतीने करण्यात आलेला जवान हा ११ महिन्यापुरता काम करेल त्यानंतर त्याची रवानगी पुन्हा राज्य सुरक्षा महामंडळात केली जाणारा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या तोंडी दिले जाणार होते!
ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल!
पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतिफची पाकिस्तानात हत्या
शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या चकमकीची नोंद सापडली
त्यानंतर आता मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याच्या वतीनं घेण्यात आला आहे. त्यासाठी गृहखात्याकडून ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेल्या पदांवर घेण्यात आलेल्या पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटींच्या खर्चाला सरकारकडून मंजुरीही देण्यात आली आहे.
नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. ११ महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती राहणार आहे. मुंबई पोलीस दलातील कंत्राट संपलं की, सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील. यासाठी १०० कोटी २१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.