मुंबई वाहतूक विभाग राज्यातील वाहतूक विभागापेक्षा सरस ठरला आहे. मुंबई वाहतूक विभागाने यंदाच्या वर्षी विक्रमी दंडाची रक्कम वसूल केली आहे.मुंबईतील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकां
कडून मुंबई वाहतूक विभागाने २०२३ या चालू वर्षात २५० कोटी रुपयांचा दंड वसूल करून हा दंड राज्य शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. १ जानेवारी ते ३०नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वसूल केलेली रक्कम गेल्या वर्षीच्या रकमेपेक्षा ४६ कोटींनी अधिक आहे.
मुंबईत वाहतुकीचे नियम जेवढे कडक आहे, तेवढेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्याचे प्रमाण देखील मोठे आहे. मागील पाच वर्षात मुंबई वाहतूक विभागाकडून मुंबईतील वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १कोटी ३९ लाख ७१हजार ६५७ वाहन चालकांना ई चलान द्वारे दंड आकारण्यात आलेला आहे, ई चलानाद्वारे करण्यात आलेल्या दंडाची रक्कम जवळपास ५७९ कोटी ९४ लाख ९८ हजार २९८ रुपयांच्या घरात गेली आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानातील सिंधींकडून रामलल्लासाठी पोशाख
अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची चुपी; स्पष्टीकरण टाळले
मुंबईत नऊ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद
महिलेलाही बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकते?
मुंबई वाहतूक पोलिसांकडून वारंवार दंडाची रक्कम भरण्यासाठी सांगण्यात येते,मात्र अनेक वाहन चालकाकडून ई चलान द्वारे आकारण्यात आलेली रक्कम वेळेवर भरली जात नसल्यामुळे दंडाची रक्कम वाढत जाते. मुंबई वाहतूक विभागाकडून थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहन चालकांचे वाहन ताब्यात घेऊन थकीत रकमेची वसुली केली जाते, तसेच थकीत रक्कम भरण्यासाठी वाहन चालकांना समन्स पाठवुन लोक अदालतच्या माध्यमातून ही वसुली केली जात आहे.
मुंबई वाहतूक विभागाकडून वर्षभरात वाहन चालकांवर कारवाई करून तसेच थकीत दंडाची वसुलीची आकडेवारी वर्षाच्या शेवटी प्रसिद्ध केली जाते. यावर्षी म्हणजेच १जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२३या कालाव धीत मुंबई वाहतूक विभागा कडून दंडाची २५० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे. ही रक्कम २०२२पेक्षा ४६ कोटींनी अधिक असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
★२०१९ ते ३० नोव्हेबर २०२३पर्यतची दंडाची आकडेवारी खालील प्रमाणे-★
◆२०१९ – १८ लाख १ हजार ११०ई -चलन दंडाची रक्कम ५९ कोटी ७०लाख ९७हजार २५० रुपये
◆२०२० – १३लाख ६४हजार ३२ ई -चलन दंंडाची रक्कम- ४१कोटी ९९लाख ९०हजार ६१९ रुपये
◆२०२१- ३७ लाख ४८हजार ६७२ ई-चलान दंडाची रक्कम- ११२ कोटी ९२ लाख ६८हजार ७५३ रुपये
◆२०२२- ३३ लाख ६८हजार ७६८ ई-चलान दंडाची रक्कम-१५९ कोटी ४७ लाख ६५हजार २०१रुपये
◆२०२३ – ३६ लाख ८९हजार ७५ ई-चलान दंडाची रक्कम-२०५कोटी ८३लाख ७६ हजार ५००रुपये.