‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील डीव्हीआर जप्त केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त डीव्हीआरमधून १३ मे रोजीच्या घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज काढले जाणार आहे. डिलिट केलेला भाग डिजिटल फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुन्हा मिळवला जाणार आहे.
पोलिसांनी शनिवारी मुख्यमंत्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराबाहेर लावलेल्या कॅमेऱ्यांचे डीव्हीआर जप्त केले होते, अशी माहिती ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिली. रविवारी ड्रॉइंगरूमसह घरातील अन्य भागांत लावलेल्या कॅमेऱ्यांचे डीव्हीआर काढून नेण्यात आले, मात्र डीव्हीआरमधून व्हिडीओचा काही भाग काढून टाकल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. सर्वसाधारणपणे ड्रॉइंगरूममध्ये कॅमेरे बसवले जात नाहीत.
मीदेखील येथे कधी सीसीटीव्ही पाहिला नाही. जर कॅमेरा नव्हताच तर त्याचे फुटेज डिलिट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पोलिसांजवळ सर्व काही आहे. जर त्यांना व्हिडीओमध्ये काही दिसते आहे, तर त्यांनी ते प्रसारमाध्यमांसमोर जाहीर करावे, असे भारद्वाज म्हणाले.केजरीवाल यें खासगी सचिव बिभव कुमार यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावताना स्थानिक न्यायालयाने डेटा डिलिट करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘पोलिसांना दिलेल्या पेनड्राइव्हमध्ये घटनेच्या वेळेचा व्हिडीओ नव्हता. तसेच, आरोपीने स्वतःचा फोन फॉरमॅट करणे, यातूनही बरेच काही स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी आवश्यक आहे,’ असा आदेश महानगर दंडाधिकारी गौरव गोयल यांनी दिला होता.
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये दोन तास चकमक; कुकी दहशतवाद्यांपासून ७५ महिलांची सुटका
भाजपच्या उमेदवाराला आठवेळा मत; व्हिडीओतील तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक
देशात पाचव्या टप्प्यात ४९ जागांचे भवितव्य ठरणार; राज्यात अंतिम टप्प्याच्या मतदानासाठी रांगा
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष रईसी यांचा मृत्यू
बिभव यांना चौकशीसाठी मुंबईत नेणार
बिभव यांनी फोन फॉरमॅट केल्यामुळे हा डाटा पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना मुंबईला न्यावे लागणार आहे. बिभव यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे कलमही लावले जाऊ शकते.
‘आप’च्या मोर्चाला पोलिसांनी रोखले
‘आप’ने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भाजप मुख्यालयापर्यंत रविवारी मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी तो मध्येच रोखला.