भारतात झाले विक्रमी लसीकरण

भारतात झाले विक्रमी लसीकरण

जग सध्या कोविडचा सामना करत आहे. त्याच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्याने, सर्वत्र लसीकरण मोहिम राबवली जात आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. त्यामध्ये भारताने विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत.

भारताच्या लसीकरण मोहिमेचा आणखी एक विक्रम भारताने करून दाखवला आहे. एका दिवसात तब्बल ८८.१३ लाख डोस भारताने दिले आहेत. त्याबरोबरच भारतातील लसीकरण झालेल्या एकूण नागरिकांचा आकडा देखील आता ५५ कोटींच्या पलिकडे गेला आहे.

हे ही वाचा:

मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

अफगाणिस्तानमध्ये विमानातही चेंगराचेंगरी

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका

भारतातील लसीकरण मोहिमेला जानेवारी महिन्यापासून सुरूवात झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही आत्तापर्यंतची लसीकरणाची सर्वोच्च आकडेवारी ठरली आहे.

या आकडेवारी बरोबरच मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे २.२५ कोटी कोविड लसीचे डोस राज्यांकडे वापरासाठी शिल्लक आहेत. त्याबरोबरच मंत्रालयाने हे देखील सांगितले की देशातील राज्य, केंद्रशासित प्रदेशांना येत्या काही दिवसात १,०९,३२,९६० इतक्या लसींचा पुरवठा देखील केला जाणार आहे.

या सोबतच भारतातील कोविडचा कहर कमी होत असल्याचे देखील समोर येत आहे. गेल्या चोविस तासात देशातील ३६,८३० रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत. याबरोबरच देशातील रिकव्हरी रेट ९७.५१ टक्क्यांपर्यंत गेला आहे. मार्च २०२० पासून हा सर्वोच्च रिकव्हरी रेट झाला आहे.

Exit mobile version