भारतातील जी- २० मध्ये विक्रमी कामगिरी; ११२ प्रस्ताव संमत

९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर रोजी जी- २० गटाची शिखर परिषद पार पडली

भारतातील जी- २० मध्ये विक्रमी कामगिरी; ११२ प्रस्ताव संमत

भारताच्या राजधानीच्या शहरात ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर या दिवशी जगभरातून अनेक देशांचे प्रमुख अवतरले होते. अवघ्या जगाचं लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे होतं. जी- २० गटाची शिखर परिषद पार पडली असून या दोन दिवसात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

‘वसुधैव कुटुंबकम’नुसार भारताने सर्व परदेशी पाहुण्यांचे भारतीय पद्धतीने जंगी स्वागत केले. या परिषदेचे सर्वच स्तरावरून कौतुक होत असताना जी – २० शिखर परिषदेत भारतने विक्रमी कामगिरी केली आहे. जी- २० शिखर परिषद जेव्हा होते तेव्हा त्यात काही प्रस्ताव मांडले जातात. त्याप्रमाणे यंदाच्या परिषदेतही काही जागतिक दृष्ट्या महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले. ११२ प्रस्तावांना या परिषदेत संमत केले गेले. त्यांच्यावर सर्व देशांनी सह्या करत संमती दर्शविली. या आधी २०१७ मध्ये झालेल्या जी- २० शिखर परिषदेत ६० प्रस्ताव संमत झाले होते.

जी- २० च्या सदस्य देशांच्या मंत्र्यांनी, प्रतिनिधींनी भारतातील विविध शहरात जाऊन पाहणी, चर्चा आणि बैठका केल्या होत्या. यावेळी ७३ परिणाम दस्तावेजांवर सह्या झाल्या. यांना लाईन ऑफ एफर्ट दस्तावेज म्हणतात. तसेच ३९ संलग्न दस्तावेज म्हणजे अध्यक्षीय दस्तावेजही संमत झाले.

जी – २० शेरपाचे अमिताभ कांत यांनी या परिषदेविषयी बोलताना म्हटले की, जी- २० च्या इतिहासातील सर्वात  महत्त्वाकांक्षी परिषद भारतात झाली. यातून बाहेर आलेले परिणाम आणि अध्यक्षीय दस्ताऐवजांची संख्या पाहता मागच्या परिषदांशी तुलना करता ते दुप्पट आहे, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’

जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या !

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

जी – २० परिषदेला ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात झाली. भारत मंडपममध्ये झालेल्या कार्यक्रमांनी दोन दिवस जगाचं लक्ष वेधलं होतं. भारत मंडपममधील समिट हॉलमध्ये ‘वन अर्थ’वर पहिलं सत्र पार पडलं. त्यानंतर ‘वन फॅमिली’वर दुसरं सत्र पार पडले. तर १० सप्टेंबर रोजी ‘वन फ्यूचर’वर तिसरं सत्र पार पडलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी – २० ची पुढील सूत्र ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांच्याकडे सूपूर्द केलं. येत्या वर्षासाठी जी – २० चे अध्यक्षपद ब्राझीलकडे असणार आहे.

Exit mobile version