‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आज, ५ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने नवा विक्रम रचला आहे. देशभरात ३२ हजार तिकिटांची विक्री होऊन हा चित्रपट वर्षातील पाचव्या क्रमांकाचा जास्त आगाऊ बुकिंग केलेला चित्रपट ठरला आहे.
हॉलीवूडचा ‘द गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम ३’ हा चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाच्या स्पर्धेत असूनही केरळ स्टोरीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. विक्रमी आगाऊ बुकिंगच्या चित्रावरून ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं
दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये ‘शहजादा’ आणि ‘सेल्फी’ या चित्रपटांना मागे टाकले आहे. शिवाय, चित्रपट वादात अडकला असला तरी त्याचा बॉक्स ऑफिसवर परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला काश्मीर फाईल्सही वादात सापडला होता. मात्र, तरीही या चित्रपटाने जवळपास २५० कोटी रुपयांचा गल्ला जमवत यशस्वी चित्रपटांच्या यादीत नाव कमावले होते.