मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील मदरशांवर मध्यप्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव सरकारने ५६ मदरशांची मान्यता रद्द केली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी श्योपूर यांच्या अहवालाच्या आधारे मध्य प्रदेश मदरसा बोर्डाने ही मोठी कारवाई केली आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालात श्योपूर जिल्ह्यात ८० मान्यताप्राप्त मदरसे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी ५४ मदरसे राज्य सरकारकडून अनुदान घेत असल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेश मदरसा बोर्डाचे सचिव म्हणाले की, राज्यभरातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात सुरू असलेल्या मदरशांची फिल्ड कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तपासणीदरम्यान राज्य सरकारच्या नियमानुसार चालवले जात नसलेले जे मदरसे आहेत, त्या मद्राशांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मध्य प्रदेश मदरसा बोर्डाकडे पाठवण्याचे सांगण्यात आले होते. नियमानुसार चालत नसलेल्या मदरशांना शालेय शिक्षण विभागाकडून मिळणारी मदत तत्काळ बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये १४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण !
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू!
विकृत दाऊद शेखने २०१९मध्येही यशश्रीला छळले होते…
विद्या चव्हाणांना चित्रा वाघ भिडल्या
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री उदय प्रताप सिंह यांनी राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात सुरू असलेल्या मदरशांच्या प्रत्यक्ष पडताळणीला गती देण्याच्या सूचनाही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. जे मदरसे नियमानुसार चालवले जात नाहीत त्यांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करावी, असे ते म्हणाले. याशिवाय खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांची प्रत्यक्ष पडताळणीही जलदगतीने व्हायला हवी, असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.