रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’

रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’

मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेत रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शक्तिकांत दास आणखी तीन वर्षे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कायम राहणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडून गुरुवारी (२८ ऑक्टोबर) रात्री या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

उर्जित पटेल गव्हर्नरपदावरुन पायउतार झाल्यानंतर ११ डिसेंबर २०१८ रोजी शक्तिकांत दास यांच्याकडे रिझर्व्ह बँकेची सूत्रे सोपवण्यात आली होती. शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्रनरपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी वित्त मंत्रालयाचे सचिव म्हणून कामकाज पाहिले होते.

हे ही वाचा:

बंदूक रोखून जालन्यात लुटली बँक

‘थलैवा’ रजनीकांत हॉस्पटिलमध्ये

झुक्याने केले फेसबुकचे नव्याने बारसे

अखेर आर्यन खानला जामीन मंजूर

शक्तिकांत दास यांना वित्त, कर, उद्योग या क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी लागू करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी संदर्भात अभ्यास करण्यासाठी जी टीम तयार केली होती, त्यात शक्तिकांत दास हे महत्त्वाचे अधिकारी होते.

३५ वर्षांच्या भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी टॅक्स, इंडस्ट्री आणि आर्थिक विषयाशी संबंधित विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती.

Exit mobile version