इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जसप्रीत बुमराहवर भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विन याने स्तुतीसुमने उधळली आहेत. तोच त्या दिवसाचा खरा हीरो होता, असे वक्तव्य अश्विन याने केले आहे. बुमराह याने या सामन्यात नऊ विकेट घेतल्या. त्यामुळे भारताने हा सामना १०६ धावांनी जिंकला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या अभूतपूर्व कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अश्विनला मागे टाकून ते स्थान मिळवले आहे.
बुमराह याने पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट घेतल्या, त्याही केवळ ४५ धावा देऊन. ही त्याची सर्वोत्तम कामगिरीपैकी एक कामगिरी आहे. तसेच, झटपट १५० कसोटी सामने घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्येही स्थान मिळवले आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने तीन विकेट जिंकून इंग्लंडल २९२ धावांत गुंडाळण्यात यश मिळवले.
हे ही वाचा..
प्रियंका गांधी यांच्या टीममधील माजी सदस्य आचार्य प्रमोद कृष्णन निलंबित!
शेतकऱ्यांचे दिल्लीला प्रयाण; हरियाणातून पंजाबला जाणारे रस्ते बंद!
हल्द्वानी हिंसाचाराला पोलिस-प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत!
पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू
विशाखापट्टणम येथील सामन्यात धडाकेबाज खेळ दाखवणारा बुमराह हा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होणारा पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे. त्याने हे स्थान भारतीय फिरकीपटू अश्विन याला मागे टाकून मिळवले. याआधी आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कपिल देव यांनी डिसेंबर १९७९ ते फेब्रुवारी १९८० या कालावधीत दुसरे स्थान मिळवले होते.
अश्विन याने त्याच्या युट्युब कार्यक्रमादरम्यान बुमराह याचे कौतुक केले. तसेच, तो बुमराहचा मोठा चाहता असल्याचे सांगितले. ‘त्या सामन्याचा खरा हिरो ‘बूमबॉल’ होता. जसप्रीत बूमराह याने खूपच चांगली गोलंदाजी केली. त्याने १४ विकेट घेऊन कसोटी गोलंदाजांमध्ये पहिले स्थान मिळवले. मी त्याचा मोठा चाहता आहे,’ अशी प्रतिक्रिया अश्विन याने दिली.
अश्विनने तीन विकेट घेऊन स्वतःच्या खात्यात ४९९ विकेट कमावल्या आहेत. त्याने १४७ चेंडूंत १०४ धावा करणाऱ्या गिलचेही कौतुक केले. भारत आणि इंग्लंड यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी तिसरा कसोटी सामना होणार आहे.