आरोग्य विभाग परीक्षेचे काम ‘त्या’ न्यासाकडेच! परीक्षेनंतर म्हणे दंड ठोठावणार

आरोग्य विभाग परीक्षेचे काम ‘त्या’ न्यासाकडेच! परीक्षेनंतर म्हणे दंड ठोठावणार

कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाची पदवीभरतीची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलावी लागल्याने राज्यभरातून टीका करण्यात आली होती. आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदवीभरतीसाठी अनुक्रमे २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा आधी हलगर्जीपणा दाखवलेल्या वादग्रस्त कंपनीकडूनच घेतली जाणार आहे. राज्य सरकारने ‘न्यासा’ या कंपनीला काळ्या यादीत टाकले नसल्यामुळे त्यांच्यामार्फतच परीक्षेची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

ऐनवेळी आरोग्य विभागाची भरतीची परीक्षा रद्द होऊन पुढे ढकलल्यामुळे राज्य सरकारला सुमारे आठ लाखांहून अधिक उमेदवारांचा रोष पत्कारावा लागला होता. या गंभीर घटनेची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बैठक घेतली.

हे ही वाचा:

यंदाही नियमांचा नवरात्रोत्सव!

न्यायालयात गाजणार ठाण्यातील खड्डे! जनहित याचिका दाखल

‘लोकांना सांगा मी क्रांतिकारी होतो’… सरदार उधम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

स्मृती मानधना ठरली कसोटी शतक झळकाविणारी पहिली भारतीय

मुख्यमंत्र्यांना परीक्षा प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती दिली असून कंपनीलाही आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होत आहे की, नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसोबतच पोलीस आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

महा आयटी किंवा सामान्य प्रशासन विभागाने न्यासा किंवा अन्य कोणत्याही कंपन्यांना काळ्या यादीत टाकलेले नाही. त्यामुळे पॅनल कंपन्यांमधूनच निवड करून हे काम देण्याची भूमिका आरोग्य विभागाने घेतली आहे. परीक्षेच्या तारखा घोषित झाल्यामुळे इतक्या कमी कालावधीत इतर कंपनीकडून काम करून घेणे शक्य नाही. त्यामुळे ‘न्यासा’कडून काम करून घेऊन परीक्षेनंतर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची किंवा आर्थिक दंड ठोठावण्याची कारवाई करण्याबाबत विचार होणार आहे.

Exit mobile version