रवींद्र जाडेजाने केला विक्रम; १७५ धावांची नाबाद खेळी

रवींद्र जाडेजाने केला विक्रम; १७५ धावांची नाबाद खेळी

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. रवींद्र जाडेजाच्या १७५ धावांच्या नाबाद खेळीमुळे भारताने आपल्या पहिल्या डावात ८ बाद ५७४ धावा केल्या आणि श्रीलंकेवर वर्चस्व मिळविले.

मोहाली येथे सुरू असलेल्या या पहिल्या कसोटीत भारताने पहिला डाव घोषित केल्यानंतर श्रीलंकेने त्याला प्रत्युत्तर देताना ४ बाद १०८ धावा केल्या आहेत. रवीचंद्रन अश्विनने २१ धावा देत २ बळी घेतले आहेत.

भारताने या कसोटीच्या पहिल्या दिवशी ६ बाद ३५७ धावा रचल्या होत्या. त्यात ऋषभ पंतच्या ९६ धावांच्या झंझावाती खेळीचा समावेश होता. ४ षटकार आणि ९ चौकारांसह त्याने ही खेळी सजविली होती. पण त्याला शतक पूर्ण करता आले नाही. अश्विननेही ६१ धावांची खेळी केली. त्याने जाडेजासह १३० धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला साडेचारशेचा टप्पा ओलांडता आला. मोहम्मद शमीनेही २० धावांची नाबाद खेळी केली.

या कसोटीचा दुसरा दिवस गाजवला तो जाडेजाने. त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ही १७५ धावांची खेळी केली. सातव्या क्रमांकावर येऊन एवढी धावसंख्या करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठऱला आहे.

हे ही वाचा:

युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा हा मोठा निर्णय

ठाण्यात रशिया-युक्रेन युद्धावर विशेष व्याख्यान

पवारसाहेब सुरज जाधववर बोला, लवासावर बोला

बोर्डाची चूक; बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार एक गुण

अश्विनसोबत त्याने शतकी भागीदारी केलीच पण शमीसह १०३ धावा जोडल्या. जाडेजा द्विशतकाच्या दिशेने जात असतानाच कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेला रोखण्यासाठी दुसऱ्या दिवशी भारताकडे ४३ षटकांचा खेळ होता. त्यात त्यांनी श्रीलंकेचे चार मोहरे टिपले. आता श्रीलंकेला भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येला मागे टाकण्यासाठी अजून ४६६ धावा हव्या आहेत.

स्कोअरबोर्ड

भारत ८ बाद ५७४ पहिला डाव घोषित (हनुमा विहारी ५८, विराट कोहली ४५, पंत ९६, रवींद्र जाडेजा ना. १७५, अश्विन ६१, शमी २०, सुरंगा लकमल ९०-२, विश्वा फर्नांडो १३५-२, लसिथ एम्बुलदेनिया १८८-२) वि. श्रीलंका पहिला डाव ४ बाद १०८ (करुणारत्ने २८, तिरिमने १७, निसांका २६, अश्विन २१-२)

 

Exit mobile version