रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अथवा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

रवींद्र धंगेकरांच्या आरोपावर मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य

रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अथवा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेंदात अग्रवालच्या ब्लड सॅम्पलशी फेरफार केल्याची नुकतीच माहिती समोर आली.या प्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली.दरम्यान, अटक करण्यात आलेले दोन्ही डॉक्टरांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचा आशीर्वाद असून त्यांच्यानुसार ते काम करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.रवींद्र धंगेकर यांच्या आरोपावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर देत दोन दिवसात माफी मागण्यास सांगितले आहे.रवींद्र धंगेकर यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हणाले.

पुणे अपघात प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे.अपघात प्रकरणातील सर्व आरोपींची सध्या चौकशी सुरु आहे.दरम्यान , आरोपी वेंदात अग्रवालच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर याना अटक करण्यात आली.डॉक्टरांच्या अटकेनंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केला आहे.डॉक्टरांच्या डोक्यावर मंत्री मुश्रिफांचा हात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला.मंत्री मुश्रीफ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि धंगेकरांनी दोन दिवसात माफी मागण्यास सांगितले अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हणाले.

हे ही वाचा:

मुलींची बाजी, कोकण ‘गुणवत्ता यादीत’ अव्वल

अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव

दिवाळी पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे फटाके?

पुणे अपघात: आरोप टाळण्यासाठी वेदांतचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, धंगेकरांना स्टंटबाजी करण्याची सवय लागली आहे.कारण ११ मे २४ मे दरम्यान मी प्रदेश दौऱ्यावर होतो.ही घटना घडली तेव्हा मी इथे नव्हतो.मी वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार घेतल्यापासून ही तिसरी घटना घडली आहे.या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यानुसार कारवाई झाली, होत आहे.येणाऱ्या लोकसभेत त्यांचा पराभव होणार असल्याने धंगेकर असे बोलत आहेत, स्टंटबाजी करत आहेत.तसेच अटक करण्यात आलेल्या दोन्ही डॉक्टरांचे मोबाईल पोलिसांनी जप्त करून पोलिसांनी उघड करावी.धंगेकरांनी २ दिवसात माजी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

Exit mobile version