‘रॉ’च्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती

रवी सिन्हा हे छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी

‘रॉ’च्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती

देशाची गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या (Research and Analysis Wing) प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. विद्यमान ‘रॉ’ प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने सिन्हा यांच्या नावाला मान्यता दिली आहे. सिन्हा हे छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी RAW चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. सिन्हा यांनी सामंत कुमार गोयल यांची जागा घेतली आहे. गोयल हे ३० जून २०२३ रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

कोण आहेत रवी सिन्हा?

रवी सिन्हा हे १९८८ बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखा करणार समान नागरी कायद्याचा प्रसार

‘डाकू हसिना’ला आवरला नाही १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह अन्…

अमेरिकेच्या व्हॉट्सऍप निर्बंधांमुळे तालिबानी सरकार चालवणे बनले मुश्किल!

मनीषा कायंदेंनी दाखवले सुषमा अंधारेंकडे बोट?

संशोधन आणि विश्लेषण विंग (रॉ) ची स्थापना २१ सप्टेंबर १९६८ रोजी झाली होती. १९६८ पर्यंत गुप्तचर यंत्रणा अर्थात आयबी (आयबी) हीच संस्था भारताच्या अंतर्गत आणि बाह्य गुप्तचर कारवाया करत असे, परंतु १९६२ आणि १९६५ च्या युद्धात भारताची गुप्तचर संस्था अपयशी ठरल्यानंतर सरकारने १९६८ मध्ये ‘रॉ’ नावाची स्वतंत्र गुप्तचर संस्था स्थापन केली होती. गुप्तचर ऑपरेशन्स, भारताच्या शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे ‘रॉ’चे काम आहे. मुख्यत्वे पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्याचे काम आहे. महत्त्वाची बांगलादेशच्या निर्मितीमध्ये ‘रॉ’नेही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Exit mobile version