आयपीएलमधून थेट कसोटी संघात प्रवेश देताना जरा विचार करा!

माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी व्यक्त केल्या काही शंका

आयपीएलमधून थेट कसोटी संघात प्रवेश देताना जरा विचार करा!

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केल्यानंतर त्यावरून चर्चा रंगू लागली आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी खेळाडूंच्या विश्रांतीवरून टीका केल्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपली परखड मते व्यक्त केली आहेत.

 

रवी शास्त्री म्हणतात की, भारतात गुणवत्तेची कमी नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी आवश्यक गुणवत्ता अगदी ठासून भरली आहे पण आयपीएलमुळे आपल्याकडे पांढऱ्या चेंडूने खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या अफाट झाली आहे. त्यामुळे त्यातून थेट कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू निवडताना विचारपूर्वक निवड व्हायला हवी.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे म्हणतात मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी मुद्दाम बसलो

पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय

पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवी, आठवीच्या परीक्षेत पास व्हावचं लागणार!

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

रवी शास्त्री यांनी कसोटी क्रिकेटचे महत्त्व सांगितले. तसेच ज्या परिस्थितीत खेळायचे, प्रतिस्पर्धी संघाची आव्हाने, तुमची खेळाच्या मैदानावरील स्वभावधर्म यावर त्यांनी भर दिला.

 

ते म्हणाले की, तुमचा स्वभावधर्म हा कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतो आव्हानात्मक परिस्थितीशी खेळाडू स्वतःला कसा जुळवून घेतो, हे महत्त्वाचे असते. संघातील वरिष्ठ खेळाडू हळूहळू अस्तंगत झाले की, त्यांच्या जागा तरुण खेळाडू घेतात. आयपीएलमध्ये अनेक तरुण आणि गुणवत्तावान खेळाडू आहेत. पण त्याचा अर्थ त्यांना थेट कसोटी संघात स्थान मिळेल अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये. त्यासाठी त्या खेळाडूंची लाल चेंडूने खेळण्याची क्षमता काय, हे बघावे लागेल. मी निवड समिती सदस्यांसोबत बसून कुणाची कामगिरी कुणाविरुद्ध कशी आहे, याचा आढावा घेईन. त्यांची क्षमता काय, कोणत्या परिस्थितीत ते खेळलेले आहेत, त्यांचा मैदानात खेळतानाचा स्वभावधर्म काय, याची माहिती करून घेईन. माझ्या मते खेळाडूचा स्वभावधर्म हा अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे. त्या खेळाडूकडे आव्हानांचा सामना करण्याची हिंमत आहे का, जेव्हा आव्हान अतिशय कठीण असेल तेव्हा त्याला तो भिडू शकतो का? हे पाहिले जाईल.

 

रवी शास्त्री म्हणतात की, भारतात गुणवत्तेची अजिबात कमी नाही पण राखीव खेळाडूंचा भरणा असला पाहिजे. त्यामुळे संघात एक स्पर्धात्मक वातावरण राहते. त्यामुळे संघातील वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा हे खेळाडू घेऊ शकतात.

 

आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने रवी शास्त्री म्हणतात की, भारतीय संघाचे भवितव्य उत्तम असेल या स्पर्धेत. विशेषतः भारतीय संघ भारतात खेळत असताना विजेतेपद मिळविण्याची अधिक शक्यता वाटते. पण त्यासाठी संघात अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचे संतुलन असले पाहिजे. या स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील.

Exit mobile version