ओव्हल येथे भारत विरूद्ध इंग्लंड सामना सुरू आहे. पण इंग्लंडमधून भारतीय क्रिकेट संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोविडची लागण झाली आहे. रविवारी शास्त्री यांची आरटीपिसीआर चाचणी पॉझिटिव आली आहे. यामुळे शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शास्त्री आणि त्यांचा सहकारी चमू हा विलगीकरणात जाणार आहे.
रवी शास्त्री यांच्या समवेत त्यांचे सहकारी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर आणि संघाचे फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल हे विलगीकरणात जाणार आहेत. जोवर या सर्वांची आरटीपिसीआर चाचणी निगेटीव्ह येत नाही तोवर त्यांना विलगीकरणात राहणे बंधनकारक असणार आहे. त्यातल्यात्या समाधानाची बाब म्हणजे शनिवारी आणि रविवारी करण्यात आलेल्या आरटीपिसीआर चाटणीमध्ये संघाचा कोणताच खेळाडू पॉझिटिव आढळलेला नाही.
हे ही वाचा:
जावेद अख्तर यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन
अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस
सावधान! गैर मुस्लिम मुलींना हिजाबच्या जाळ्यात ओढण्यासाठी सुरु आहेत कुरापती
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड मध्ये कसोटी मालिका खेळत असून या मालिकेचा चौथा सामना सध्या ओव्हल या मैदानावर खेळला जात आहे. आतापर्यंत या मालिकेत पहिल्या तीन सामन्यांमध्ये दोन्ही संघाने एक एक सामना जिंकत बरोबरी साधली आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने सध्या सुरू असलेला चौथा सामना आणि येऊ घातलेला पाचवा सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पण अशा या महत्त्वाच्या टप्प्यावर संघाचे प्रशिक्षक कोविड पॉझिटिव आल्यामुळे ही संघासाठी अडचणीची बाब असल्याचे मानले जात आहे.