राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे. महायुतीने २३० जागांवर विजय मिळवत मविआच्या सुपडा साफ केला. माहितीनुसार, महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका करत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा गुजरातला व्हावा असे म्हटले आहे. संजय राऊतांच्या टीकेवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. त्यांनी महाराष्ट्रात शपथ घेण्यापेक्षा गुजरातला जाऊन शपथविधी सोहळा घ्यावा, त्यांना याचा जास्त आनंद होईल. गुजरातला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक मोठा स्टेडिअम आहे तिथे जास्त लोक बसतात. त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा घेणं अतिशय योग्य ठरेल. शिवतीर्थावर घेतला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल, वानखेडे स्टेडिअमवर घेतला तर १०६ हुतात्म्यांचा अपमान होईल, त्यामुळे त्यांनी शपथ गुजरातला घ्यावी.
यावर संजय शिरसाट म्हणाले, आम्ही शपथ गुजरातला अथवा लंडनला घ्यावी हे सांगण्याचे संजय राऊतांनी गरज नाही. तुमची जी अक्कल आहे ती उबाठाच्या नेत्यांना पाजळावी आणि शरद पवारांच्या दरवाजासमोर पाहणी करणाऱ्याच्या भूमिकेत राहा, अस शिरसाट म्हणाले.
हे ही वाचा :
मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० रुपये कोटींचा झाला!
मशिदीच्या सर्वेक्षणावरून यूपीच्या संभलमध्ये तणाव, दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या!
विकास, उत्तम प्रशासनाचा आणि परिवारवादाला मूठमाती देणारा हा विजय
महाराष्ट्रात त्सुनामी; महायुतीने केला मविआचा सुपडा साफ, भाजपाचे ऐतिहासिक यश