आज जागतिक मत्स्यपालन दिन. घराघरात मासे पाळण्याची हौस अनेकांना असते. रंगीबेरंगी, विविध आकाराचे मासे पाळण्याचा छंद जोपासणाऱ्यांसाठी आता मोठ्या बाजारपेठाही उपलब्ध आहेत. रत्नागिरी हे अशा बाजारपेठेचे एक केंद्र आहे. या बाजार पेठेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे तेथील स्थानिक तरूणांना रोजगाराची संधी सुद्धा निर्माण झाली आहे.
रंगीबेरंगी आकर्षित मासे पाळणे असा काही जणांना छंदच लागला आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून या बाजार पेठेत झपाट्याने वाढ होत असून, कोट्यावधीची उलाढाल ही होत आहे. त्याचप्रमाणे मासा हा शांत व आवाज न करणारा जलचर प्राणी असल्याने तो पाळण्याकडे अनेकांचा कल असतो. अलीकडे रत्नागिरीहून मुंबईमध्ये मासे आणले जाते. जे नागरिक मासे पाळतात त्यांनी किमान १५ ते २० दिवसांतून एकदा ७० टक्के पाणी बदलावे त्यामुळे माशाचे आरोग्य सुधारते अशी माहिती रत्नागिरी मत्स्य व्यावसायिक राजेश नंदकूमार पाटील यांनी दिली.
हे ही वाचा :
पाच लाखांचे बक्षीस असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक
उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?
इंडोनेशिया भूकंपाने हादरले, शेकडो घरांची पडझड , १६२ ठार
फिजियोथेरेपीस्ट नव्हे हा तर रेपिस्ट
घरोघरी मासे पाळण्यासाठी आकर्षित व विशिष्ट प्रकारचे काचेचे फिशटॅक किंवा बाउल उपलब्ध करून देणारी दालने मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात उपलब्ध आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २५ माशांची विविध प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांमधून दिवसाला तीन ते चार हजार रुपयांची विक्री होत असते. वर्षभरात माशांच्या व्यावसायतून सव्वातीन कोटी रुपयांची उलाढाल होत असते. तसेच या माशांमद्धे सर्वाधिक पसंती ही गोल्ड तसेच आरवाना, फ्लोरान किंवा फ्लॉवर हॉर्न व शार्क माशांना अधिक मागणी असूण एंजल मासा सुद्धा आवडीने पाळला जातो.