जोगेश्वरीतील रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञातीच्या शाळेचे संकेतस्थळ आता सर्वांसाठी खुले

शाळेविषयी मिळणार संपूर्ण माहिती

जोगेश्वरीतील रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञातीच्या शाळेचे संकेतस्थळ आता सर्वांसाठी खुले

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे नवे संकेतस्थळ आता सर्वांसाठी उपलब्ध असून त्याद्वारे शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती, शाळेच्या प्रवेशासंदर्भातील माहिती सर्वांना खुली होणार आहे. त्यातून शाळेची वाटचाल लोकांपर्यंत पोहोचणार आहे. नुकतेच या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलच्या संकेतस्थळाचे (वेब साईट) उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष व शाळेचे चेअरमन सहदेव सावंत साहेब व भारत 24 तास, न्याय रणभूमीचे संपादक संदीप कसालकर साहेब यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीईओ दीपक खानविलकर यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कार्याध्यक्ष सहदेव सावंत व उपकार्याध्यक्ष गणपत तावडे साहेबांनी पुष्पगुच्छ देऊन केले. वेब साईटचे सादरीकरण सचिव यशवंत साटम यांनी केले. वेबसाईटवर शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या विविध उपक्रमाचे छायाचित्र व माहीती सुबकरीत्या मांडली आहे, त्याच बरोबर शाळेतील प्रवेशा सबंधी सोप्या पध्दतीत माहिती दिली आहे.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कसालकर यानी डीजिटल युगाचे महत्व सांगून सर्व शिक्षकांनी www.rjmdsschool.com  ही आपली वेब साईट वॉट्सऍप ग्रृपवर टाकावी असे सांगितले तर चेअरमन सहदेव सावंत यांनी वेबसाईट डीजाईन करणारे चैतन्य व या साठी सर्व फोटोग्राफ्स, माहिती अथक परीश्रमाने गोळा करणारे संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विजय जाधव व संगणक शिक्षिका अमिषा सुर्वे यांचा सन्मान करून कौतुक व अभिनंदन केले व ही वेबसाईट सर्व शिक्षक,अन्य स्टाफ यानी पालकांपर्यंत पोहचवावी व पहाण्यास लावावे असे आवाहन केले.

हे ही वाचा:

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

पृथ्वीराज चव्हाण तहव्वूर राणासाठी आले धावून!

पश्चिम बंगाल: अनेक जिल्हे हिंदूमुक्त करण्याचे षड्यंत्र!

“कॅप्टन की रन मशीन?”

या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक परब, सरचिटणीस जितेंद्र पवार, शालेय प्रशासकीय समितीचे अध्यक्ष सुबोध बने, कार्यकारिणी सदस्य सुशिल चव्हाण, विजय खामकर, सुहास बने, इंद्रायणी सावंत मुख्याद्यापिका डिम्पल मॅडम, शबनम मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते. तर आलेल्या पाहुण्यांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका डींपल दुसाणे मॅडमनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

Exit mobile version