29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषचक्रीवादळाने रत्नागिरीत मोठे नुकसान

चक्रीवादळाने रत्नागिरीत मोठे नुकसान

Google News Follow

Related

आज सकाळपासून कोकण किनारपट्टी, मुंबई अशा सगळ्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला. रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः अनेक झाडे उन्मळून पडणे, विजेचे खांब कोसळणे अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या. सध्या वादळ गुजरातकडे सरकल्याने वादळाचा जोर दक्षिणेकडे किंचित कमी झाल्याने नुकसानाची पाहणी करायला सुरूवात करण्यात आली आहे. विजेचे खांब कोसळल्याने कोविड सेंटरला देखील धोका निर्माण झाला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय. हजारो घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. वादळी वाऱ्यात अनेक झाडं पडली. या पावसात झालेल्या नुकसानाची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून देण्यात आलीय.

आजच्या दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १ हजार १८९ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय.

हे ही वाचा:

पालिकेच्या ग्लोबल टेंडरला शून्य प्रतिसाद

परमबीर यांच्यावरील आरोपप्रकरणी घाडगेंना सीआयडीकडून समन्स

जगभरातील मुस्लिम कट्टरवाद्यांचे ज्यू विरोधी फुत्कार

व्हेंटिलेटर्सवरून राजकारण कशाला करता; फडणवीसांचा सवाल

रत्नागिरी जिल्ह्यातील घरांचे नुकसान

मंडणगड तालुक्यात २००, दापोली तालुक्यात ३५०, खेड तालुक्यात ३०, गुहागर ५, चिपळूण ६५, संगमेश्वर १०२, रत्नागिरी २००, राजापूर ३२ असे मिळून एकूण १ हजार २८ घरांचं नुकसान झालंय. तर रत्नागिरीमध्ये १, लांजामध्ये १ आणि राजापूरमध्ये ५ असे एकूण ७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागरमध्ये १, संगमेश्वरात १, रत्नागिरीमध्ये ३ आणि राजापूरमध्ये ३ असे एकूण ८ नागरिक जखमी झाले. गुहागरमध्ये आणि संगमेश्वरात प्रत्येकी १ बैल आणि रत्नागिरीमध्ये २ शेळ्या असे ४ पाळीव प्राण्याचे मृत्यु झाले आहेत. जिल्ह्यामध्ये सुमारे ४५० झाडांची पडझड झाली असून १४ दुकाने व टपऱ्या, ९ शाळा आणि तर २१ शासकीय इमारतींचे नुकसान झालं आहे.

वादळामुळे राजापूर, रत्नागिरी, दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्यातून एकूण ४५६३ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी १ हजार १८९ मिमी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी एकूण १ हजार १८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, लांजा या तालुक्यांमधील पावसाची मोजदाद करण्यात आली. पावसाचा हा प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे. आज (१७ मे २०२१) पासून संबंधित तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळवले आहे.

चक्री वादळामुळे वीज पुरवठा खंडीत

एकूण १२३९ गावांपैकी ७६० गावांचा वीजपुरवठा बंद आहे तर ४७९ सुरू आहे. तर एकूण ५५ उपकेंद्रांपैकी २७ सुरू असून २८ बंद आहेत. अनेक विजेचे खांब या वादळामुळे कोसळले आहेत.

१६ कोविड सेंटरमध्ये वीज गायब

तौत्के चक्रीवादळाचा फटका रत्नागिरीतील कोविड रुग्णांनाही बसला आहे. एकूण ३९ कोविड रुग्णालयांपैकी २३ रुग्णालयांमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पण अद्याप १६ कोविड रुग्णालयातील वीज पुरवठा पुर्ववत झालेला नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. तर एकूण ३ ऑक्सिजन प्लान्ट पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. या चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका बसल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा