23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषरत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी...

रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी…

Google News Follow

Related

त्नागिरी एसटी बस डेपोचे काम गेल्या पाच-सहा वर्षांपासून रखडलेले आहे. कोरोनाच्या आधीपासून रत्नागिरी मुख्य बस डेपोचे काम सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून हे काम रखडलेल्या स्थितीत आहे. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. हे काम कधी महामंडळ पूर्ण करणार अशी संतप्त भावना प्रवाशांमध्ये निर्माण झालेली आहे.

रत्नागिरी बस स्थानक बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी किंवा आपल्या गावी जाण्यासाठी जुन्या बसस्थानकाच्या बाहेर उन्हात ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. बस सोडण्यासाठी दुसरा पर्याय म्हणून बसेस रहाटघर बस स्थानकातून सुटण्याची व्यवस्था महामंडळाने केलेली आहे. हे बस स्थानक रत्नागिरी शहरापासून बऱ्याच अंतरावर असल्यामुळे प्रवाशांना पायी रपेट करावी लागत आहे. त्यामुळे वयस्कर व आजारी व्यक्तींना भयंकर त्रासाचा सामना करावा लागत आहे. या स्थानकात पोहोचण्यासाठी रिक्षावाले भरमसाठ पैसे प्रवाशांकडून उकळत असल्यामुळे त्यांच्या खिशाला झळ बसतेय, असे महेंद्र हळदणकर यांनी सांगितले. रहाटघर बस स्थानकातून गावात सुटणाऱ्या बसेस हे बहुतांश रद्द केल्या जातात किंवा उशीराने धावत असतात. त्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना त्याला सामोरे जावे लागत आहेत.

हेही वाचा :

दहशतीचा, अत्याचारांचा अध्याय संपुष्टात आला!

अमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश

गुडघेदुखीतून बरा होत रणदीप हुडा करतोय सावरकरांवरील चित्रपटातून पुनरागमन

महाराष्ट्रात रस्ते ठरत आहेत जीवघेणे, तीन वर्षांत मृतांचा आकडा २ हजारांनी वाढला

रत्नागिरी मुख्य बसस्थानकाचे काम ठेकेदार आणि परिवहन महामंडळ यांच्यात कामाचे बजेट वाढवून देत नसल्याने रखडले. बजेट वाढवून देण्याची मागणी ठेकेदाराकडून करण्यात आली होती. त्यामुळे हे काम एसटी महामंडळ आणि ठेकेदार यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे हायटेक एसटी बसस्थानकाच्या कामाचा बोजवारा उडालेला आहे.

या कारभाराचा नाहक त्रास प्रवाशांना बसायला लागला. प्रवाशांना बसस्थानकाच्या ठिकाणी उन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. रत्नागिरी मुख्य बसस्थानकाच्या बाहेर झाडाचा आधार घेऊन प्रवासी उभे असतात. फक्त सीटी बस जुन्या डेपोमधून सुटत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षम कारभाराचा हे उत्तम उदाहरण आहे. गेले कित्येक वर्षापासून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आसरा शेड एसटी महामंडळ उभारू शकलेली नाही. एसटी महामंडळाकडे जर पैसे नव्हते तर जुने बस स्थानक तोडले कशाला, नवे बांधत नाही आणि जुने तोडून बसले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया तुकाराम शेव़डे यांनी दिली.

रत्नागिरी नवीन बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी कधी येतोय याची प्रवासी चातकासारखी वाट पाहताहेत. प्रवाशांच्या मनात आजही एसटीबद्दल प्रेम आहेच. प्रवासी म्हणताहेत डेपोची वाट पाहीन पण एसटीनेच आपल्या गावी जाईन.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा