काश्मीर खोऱ्यातील केशर दराच्या बाबतीत सध्या मिठाईला सुशोभित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वर्खाला जोरदार स्पर्धा देत आहे. सर्वोत्तम दर्जाचे १० ग्रॅमचे केशर ४ हजार ९५० रुपयांना मिळते. तर, १० ग्रॅमचा चांदीचा वर्ख ८०० रुपयांना मिळतो. सध्या १० ग्रॅम चांदीची किंमत ७३० रुपये आहे.
सोन्याचे पान आपले वजन अजून टिकवून आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ५९ हजार रुपये आहे. गेल्या वर्षीपेक्षा या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, सोन्याच्या वर्खाच्या १५० शीट्सच्या बॉक्सची किंमत ३७ हजार ५००वरून ५२ हजार ५००पर्यंत पोहोचली आहे. दराच्या किमतीतील तफावतीमुळे सोन्याच्या वर्खापेक्षा चांदीच्या वर्खाला नेहमीच अधिक मागणी असते.
केशर आणि चांदीचा वर्ख हे दोन पदार्थ भारतीय मिठायांचा अविभाज्य भाग आहेत. ‘दोन्हींचा वापर मिठाईमध्ये केला जातो. त्यामुळे मिठाई आकर्षकही होते आणि वेगळी चवही येते. ग्राहक या मिठाईंना पसंती देतात,’ अशी माहिती आरिक जैन यांनी दिली. जैन हे अहमदाबादस्थित जैनम सिल्व्हर प्रोडक्टसचे संचालक आहेत.
हे ही वाचा:
वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्यांनी केले ५५ लाखांचे नुकसान
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरला; तीन पक्षांमध्ये ‘अशी’ होणार वाटणी
वाजवा रे वाजवा! आता विवाहसोहळ्यात बॉलीवूड गाण्यांना बंदी नाही
अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाहीत ते मोदींना नऊ वर्षांत काय केलं विचारतायत
ही कंपनी चांदीचे आणि सोन्याचे वर्ख बनवते. चेन्नईस्थित बेल सॅफ्रॉन्स ही कंपनी अशा प्रकारचे उत्पादन बनवणाऱ्यांतील आघाडीची विक्रेती आहे. कोणतेही खत अथवा रसायने वापरली जाणार नाहीत, याची खात्री आम्ही शेतकऱ्यांकडून करवून घेतो, असे या कंपनीचे सहसंस्थापक नीलेश मेहता यांनी सांगितले. त्यामुळेच आमच्या कंपनीला ब्रसेल्सस्थित इंटरनॅशनल टेस्ट इन्स्टिट्यूटकडून पुरस्कार मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. ‘केशरच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के वाढ झाली आहे,’ असे मेहता यांनी सांगितले. मेहता यांचे कुटुंब गेल्या ६० वर्षांपासून या व्यवसायात आहे.
गुरुवायूर मंदिरात प्रतिमहिना ५ लाखाचे केशर
केशरला जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळाल्यापासून केशरच्या किमतीत वाढ झाली आहे. केशरची किंमत २.८ लाख प्रति किलोपासून ४.९५ लाख प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. या केशरचा सर्वांत मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे केरळमधील गुरुवायूर मंदिर. ते दर महिन्याला थ्रिसूरस्थित अब्दुल अझीझ आणि कंपनीकडून १० किलो केशर विकत घेतात. या मंदिरातील देवता गुरुवायूरप्पन याला केसर आणि केशरचा लेप दिला जातो, ज्याला कालाभम असे म्हणतात. केशराचा उपयोग मिठाईसह बिर्यानीतही केला जातो. तसेच, आयुर्वेद आणि उनानी औषधांतही त्याचा वापर केला जातो.