मध्य प्रदेशची राजधानी भोपाळजवळ असललेल्या ‘रातापाणी व्याघ्र प्रकल्प’ आता नवी ओळख मिळणार आहे. या व्याघ्र प्रकल्पाला पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ विष्णू श्रीधर वाकणकर यांचे नाव देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले. शुक्रवारी (१३ डिसेंबर) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रातापाणी व्याघ्र प्रकल्पा’चे उद्घाटन झाले.
पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. वाकणकर यांनी जगप्रसिद्ध ‘भीमबेटका लेण्यां’चा शोध घेतला होता आणि त्याला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. ‘रातापाणी व्याघ्र प्रकल्पा’ला आता डॉ. वाकणकर यांचे नाव देण्यात येणार आहे.
राज्यातील वन्यजीव संपत्ती अधिक समृद्ध करण्यासाठी रातापाणी व्याघ्र प्रकल्पाला परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी राज्यातील जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यावेळी चित्रपट अभिनेता रणदीप हुड्डा विशेषत: उपस्थित होता.
व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री यादव यांनी सांगितले. रातापाणी परिसर हे वाघ आणि इतर वन्यजीवांचे नैसर्गिक घर आहे. १९७६ मध्ये याला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
हे ही वाचा :
संभलमध्ये मशिदी-मदरशांमधून १.३० कोटी रुपयांची वीज चोरी!
सुनील पालचे अपहरण करणारा आरोपी गजाआड!
ईव्हीएमवर विश्वास नसेल तर निवडणुका लढवू नका! ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला
३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ
दरम्यान, विष्णू श्रीधर वाकणकर हे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ होते. १९५७ मध्ये भीमबेटका लेणी आणि १९६४ मध्ये कायथा संस्कृतीचा शोध लावण्याचे श्रेय वाकणकर यांना जाते. २००३ मध्ये, UNESCO ने भीमबेटका रॉक लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवले.