भारताचे जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात दुःख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रपतीसह देशातील प्रत्येक नागरिकांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दिल्लीयेथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना सुरवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आणि टाटा समूहाच्या उद्योगासह देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती सांगितली. मंत्री अमित शाह म्हणाले, रतन टाटा यांना माझ्याकडून मनपूर्वक श्रद्धांजली. रतन टाटा हे देशासह जगाचे सन्माननीय उद्योजक राहिले. टाटा समूहाच्या साऱ्या उद्योगाचे निरीक्षण आणि कामाच्या पद्धतीमध्ये परिवर्तन केले. पहिल्यासह आजही टाटा समूह भारताच्या उद्योग जगतात एक ध्रुव तारा बनून आहे, यामध्ये रतन टाटा यांचे मोठे योगदान आहे.
देशात नियमांखाली आपल्या उद्योगाचा-समूहाचा विकास करणे, देशातील सर्व कायदेकानून, नियम आणि अटी यांचे पालन करून आपल्या उद्योग समूहाला प्रमुखस्थानी ठेवणे. तसेच आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून देशातील सर्व समस्यांचे निराकरण करून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न रतन टाटा यांनी केला.
हे ही वाचा :
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा
स्त्री शक्तीचा जागर: पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे
दुर्गेचे आठवे रूप ‘महागौरी’ – महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा
दरम्यान, १९३७ मध्ये जन्मलेले रतन टाटा १९९१ ते २०१२ पर्यंत टाटा समूहाचे प्रमुख होते. या काळात त्यांनी टाटा समूहाला नव्या उंचीवर नेले. वयाच्या ५४ व्या वर्षी टाटा समूहाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या रतन टाटा यांच्यासाठी ही जबाबदारी पार पाडणे, समूहाला पुढे नेणे आणि समूहाशी संबंधित लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे सोपे नव्हते. पण, जबाबदारी घेत रतन टाटा यांनी टाटा समूहाला नवे रूप देत, उद्योग क्षेत्रात टाटा समूहाचे नाव शिखरावर नेले.