रतन टाटा मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीने सन्मानित

रतन टाटा मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीने सन्मानित

ज्येष्ठ प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्रातील एचएसएनसी विद्यापीठाने मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान केली आहे. रतन टाटा यांच्या समाजातील योगदानाबद्दल विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान केली आहे. शनिवार, ११ जून रोजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि या विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी रतन टाटा यांना ही पदवी प्रदान केली.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील एक आदर्श व्यक्ती नाहीत तर, नम्रता, मानवता आणि मूल्यांना प्रोत्साहन देणारे एक महान व्यक्ती आहेत. रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान आहे,” असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं.

त्यानंतर रतन टाटा यांनी विद्यापीठाचे आभार मानताना सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असून एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना आहे. विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’

“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”

नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

रतन टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. रतन टाटा हे पद्मभूषण (२०००) आणि पद्मविभूषण (२००८) या दोन पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आहेत. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील २५ सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या २००८ च्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.

Exit mobile version