रतन टाटांना ‘आसाम वैभव’ पुरस्कार

रतन टाटांना ‘आसाम वैभव’ पुरस्कार

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आसाम सरकारकडून आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘आसाम वैभव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मात्र, हा पुरस्कार घेण्यासाठी रतन टाटा हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या प्रतिनिधींनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रतन टाटा हे उपस्थित राहिले नव्हते.

आसाम सरकारच्या २०२१ या वर्षासाठी साठी आसाम वैभव पुरस्कार प्रदान करण्याच्या निर्णयाचे खूप कौतुक आणि आभारी असल्याचे रतन टाटा यांनी म्हटले. तुमच्याकडून हा पुरस्कार मिळणे हा एक सन्मान आहे. आयोजित कार्यक्रमात वैयक्तिकरित्या पुरस्कार स्वीकारण्याची असमर्थता समजून घेतल्याबद्दल त्यांनी आसाम सरकारचे आभार मानले. त्यांनी पत्रामध्ये आसामच्या जनतेचेही आभार मानले आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २०२१ सालच्या आसाम वैभव, आसाम सौरव आणि आसाम गौरव पुरस्कारांची घोषणा केली. त्यानुसार सोमवारी २४ जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला.

हे ही वाचा:

व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी

शेअर बाजारात झोमॅटो, नायकाची झाली घसरण…

कर्नाटकच्या शाळेत नमाज पढण्याचे प्रकरण तापले… हिंदू संघटनांचे चौकशीचे आदेश

लवकरच कोरोना संपणार?

आसाम सौरव पुरस्कार प्राध्यापक कमलेंदू देब क्रोरी, डॉ लक्ष्मणन एस, प्राध्यापक दिपक चंद जैन, लोव्हलिना बोरगोहेन आणि नील पवन बरुआ यांना देण्यात आला. तर, आसाम गौरव पुरस्कार मुनिंद्र नाथ नगाटे, मनोज कुमार बसुमातारी, हेमोप्रभा चुटिया, धरणीधर बोरो, डॉ. बसंता हजारिका, खोरसिंग तेरांग, नमिता कलिता, कौशिक बरुआ, बॉबी हजारिका, आकाश ज्योती गोगोई, डॉ आसिफ इक्बाल, डॉ. बोरो, आणि बोरमिता मोमीन यांना देण्यात आला.

Exit mobile version