रतन टाटांनीही घेतली कोविडची लस

रतन टाटांनीही घेतली कोविडची लस

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देखील कोविडची लस घेतली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.

या वेळी ट्वीटरवरून त्यांनी कोविड लसीचा पहिला डोस मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी यात लसीबद्दल एफर्टलेस आणि पेनलेस म्हटले आहे. रतन टाटा यांनी यावेळेला प्रत्यकाला लस मिळेल अशी आशा देखील व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

कोळसा घोटाळ्याप्रकरणी ममतांच्या अडचणीत वाढ

सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी

जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे – सचिन वाझे

भारतात सिरम इन्स्टिट्युटकडून उत्पादन केल्या जात असलेल्या ऑक्सफर्ड- ॲस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींचा लसीकरण मोहिमेत वापर केला जात आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी सुरूवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना लस देण्यात आली होती. १ मार्चपासून या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. त्याबरोबरच सहव्याधी असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना देखील लस देण्यात येत आहे.

देशांतर्गत लसीकरणासोबतच भारताने इतर अनेक देशांना देखील लसींचा पुरवठा केला आहे. त्याबद्दल जागतिक स्तरावर भारताचे कौतुक केले जात आहे, त्याबरोबरच मोदींचे आभार देखील मानले जात आहेत.

 

Exit mobile version