‘रतन टाटा….एक युग संपले’

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी वाहिली श्रद्धांजली

‘रतन टाटा….एक युग संपले’

उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवर पोस्टकरत श्रद्धांजली वाहिली, ‘एक युग संपले’ असे त्यांनी म्हटले आहे.

अमिताभ बच्चन ट्वीटकरत म्हणाले, श्री रतन टाटा यांच्या निधनाची बातमी नुकतीच कळली. रात्री उशिरापर्यंत काम करत होते, एका युगाचा अंत झाला आहे. ते एक अत्यंत आदरणीय, विनम्र पण अफाट दूरदृष्टी आणि दृढनिश्चयाचे नेते होते. आम्ही अनेक मोहिमांमध्ये एकत्र सहभागी झालो, मला त्यांच्यासोबत अद्भुत क्षण घालवण्याची संधी मिळाली. माझी त्यांना प्रार्थना, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले.

अभिनेत्री अनुष्का शर्मा ट्वीटकरत म्हटले, श्री रतन टाटा यांच्या दु:खद बातमीने खूप दुःख झाले. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणा, आदर आणि प्रतिष्ठा ही मूल्ये जपली. ते भारताचे मुकुट (ताज) होते. तुम्ही अनेकांचे भले केले आहे, असे अनुष्काने म्हटले.

हे ही वाचा : 

‘रतन टाटा यांना आयुष्यभर देशाचाच विचार’

जैसलमेरमध्ये वक्फ बोर्डाचे अतिक्रमण हटवले

रतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना

‘रतन टाटा यांना भारतरत्न द्या’

Exit mobile version