देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? पाहिलं असेल तरी फक्त ३ % लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं टीका होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाने सरस्वती देवीच्या पूजेचं पाठवलंलं आमंत्रण चर्चेचा विषय ठरत आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात देवी सरस्वती पूजन करण्याबाबतचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये सरस्वती पूजन कार्यक्रम दुपारी १ वाजता आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे, ही आग्रहाची विनंती असं या आमंत्रणात नमूद करण्यात आलं आहे. एकीकडे भुजबळांचे विपरित विधान अणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्याच कार्यलयात सरस्वती पूजनाचे आयेजन यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला देवी सरस्वतीबाबत उपरती झाली का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी देवी सरस्वती संदर्भात केलेलं विधान चांगलच वादग्रस्त ठरलं हेतं. सर्वच थरातून भुजबळांच्या या विधानावर भरपूर टीका करण्यात आली होती. भुजबळांचा हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल चेंबूर येथील एका रहिवाश्याला मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप भुजबळांवर करण्यात येत आहे. या व्यक्तीने चेंबूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती .
राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज सरस्वती पूजन.
नेमका खरा चेहरा कुणाचा ?
भुजबळ सरस्वतीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणार आणि राष्ट्रवादी थेट कार्यालयात सरस्वती पूजन करणार? pic.twitter.com/FNTMD7Rqie— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 4, 2022
हे ही वाचा:
अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार
पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी
जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या
मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनीही राष्ट्रवादीचे हे आमंत्रण ट्विट करून टोला लगावला आहे.राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज सरस्वती पूजन, नेमका खरा चेहरा कुणाचा ? भुजबळ सरस्वतीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणार आणि राष्ट्रवादी थेट कार्यालयात सरस्वती पूजन करणार?, असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.