पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील २९ बालकांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार बालकांचा समावेश आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या व्हर्चुअल समारंभात पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करत विजेत्यांशी संवाद साधला.
यामध्ये मुंबईची रिया राय (१३) , पुण्याची जुई केसरकर (१५), जळगावची शिवांगी काळे (६) आणि नाशिकचा स्वयम पाटील (१४) या महाराष्ट्रातील चार कर्तृत्ववान बालकांचा समावेश आहे. नवसंशोधन, शैक्षणिक यश, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहेत. यावर्षी २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. गेल्या वर्षी करोनामुळे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. त्यामुळे यंदा गेल्या वर्षी पुरस्कार जाहीर झालेल्यांनाही गौरवण्यात आले आहे. विजेत्यांमध्ये वर्ष २०२१ च्या ३२ बालकांचा समावेश होता. पदकामध्ये एक लाख रक्कम आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. ” जगातील बहुतेक मोठय़ा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय तरुण आहेत. आणि ही भारतासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. जगभरात भारतीय तरुण जी भरारी घेत आहे ते गौरवास्पद असून विविध क्षेत्रांत बालके प्रगती करतात त्याचे मला खूप कौतुक वाटते.” असे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.
हे ही वाचा:
देशविरोधी भाषण करणाऱ्या शर्जिल इमामविरोधात देशद्रोहाच्या खटल्याचे आदेश
‘मुंबई महापालिकेत भाजपचेच कमळ फुलणार’
‘टिपू उद्यानावरून शिवसेनेची लाचारी कळली!’
दिल्ली सरकारचे तळीरामांसाठी घे दारू, घे दारू! फक्त ३ दिवसच ड्राय डे
३ जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल चार कोटी बालकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली असून, संपूर्ण समाजाला यातून प्रेरणा मिळत असल्याचेही यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.
महाराष्ट्रातील चार बालकांच्या गौरवाचे कारण!!
मुंबईच्या जिया रायने अपंगत्वावर मात करत ओपन वॉटर पॅरास्विमिंग जागतिक विक्रम नोंदवल्यामुळे तिला क्रीडा श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. अवघ्या सहा वर्षाच्या शिवांगी काळे ने विजेच्या धक्क्यापासून आई व बहिणीचे प्राण वाचल्यामुळे तिला शौर्य पुरस्कार मिळाला आहे. तसेच पोहण्यात जागतिक विक्रम करणाऱ्या स्वयमला क्रीडा श्रेणीत आणि जुईने ‘ जे ट्रेमर ३ जी ‘ उपकरण तयार केल्यामुळे तिला नवसंशोधन श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे.