९३ वर्ष जुनं आहे मुघल गार्डन…  जाणून घ्या कोणी बांधलं

९३ वर्ष जुनं आहे मुघल गार्डन…  जाणून घ्या कोणी बांधलं

वसंत ऋतूत सर्वत्र फुलांनी निसर्ग बहरून जातो आणि याच या ऋतूत मुघल गार्डनकडे निसर्गप्रेमींची पावले वळू लागतात येते. राष्ट्रपती भवन संकुलात असलेले मुघल गार्डन शनिवारपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. २१ मार्चपर्यंत या भव्य उद्यानात बहरलेली देशी-विदेशी फुले लोकांना पाहता येणार आहेत. आता हेच गार्डन अमृत गार्डन म्हणून ओळखले जाणार आहे. मुघल गार्डन म्हटले की हे देखील लाल किल्ला आणि इतर सर्व ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे मुघल शासकाने बांधली असे मनात येते. पण तसे नाही. मुघल गार्डन ब्रिटीश राजवटीत ते बांधले गेले.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रपती भवन हे नाव व्हाईसरॉयचे घर असे आणि कोलकाता ही राजधानी असायची. इंग्रजांनी १९११ मध्ये कोलकाता ऐवजी दिल्ली आपली राजधानी म्हणून जाहीर केली.त्यानंतर रायसीना टेकडी कापून व्हाइसरॉयचे घर म्हणजेच सध्याचे राष्ट्रपती भवन बांधण्यात आले.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

व्हाईसरॉय हाऊसमध्ये खास फुलांची बाग बनवण्यात आली होती पण तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या पत्नी लेडी हार्डिंग यांना ही बाग आवडली नाही असे म्हटलेजाते. सर एडविन लुटियन्स यांनी १९१७ च्या सुरुवातीला मुघल गार्डनच्या डिझाइनला अंतिम रूप दिले आणि ते १९२८ मध्ये मुघल गार्डन या नावाने बांधून पूर्ण झाले.

लुटियन्सने बागेत भारतीय संस्कृती आणि मुघल शैलीची झलक दाखवली. मुघल गार्डन हे अशा प्रकारचे एकमेव उद्यान आहे, जिथे जगभरातील रंगीबेरंगी फुले पाहता येतात. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले होते.

Exit mobile version