भारताचे राष्ट्रपती भवन हे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुले होणार आहे. १ ऑगस्ट पासून पर्यटकांना राष्ट्रपती भावनांची सफर करणे शक्य होणार आहे. तर त्यासोबतच राष्ट्रपती भवनातील वस्तू संग्रहालयही खुले केले जाणारा आहे. राष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून या संबंधीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय लोकशाहीतील एक महत्वाची अशी ऐतिहासिक वास्तू अर्थात राष्ट्रपती भवन हे पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. दरवर्षी ठराविक कालावधीसाठी राष्ट्रपती भवन हे पर्यटकांसाठी खुले करण्यात येते. यावेळी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल २०२१ रोजी निर्णय घेऊन राष्ट्रपती भवन हे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. पण आता कोविडचा प्रादुर्भाव कमी होऊन निर्बंधांत शिथीलता आणली जात आहे. त्यामुळेच आता राष्ट्रपती भवनची वास्तूही १ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
तळई येथील दुर्घटनाग्रस्तांना मोदींनी दिला मदतीचा हात
लोकल सुरू करा! भाजपाचे सविनय नियमभंग आंदोलन
कोल्हापूरला पुराचा पुन्हा वेढा
चिपळूणमध्ये ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू
प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवार राष्ट्रपती भवनाची सफर करता येणार आहे. सकाळी १० ते ११.३०, दुपारी १२.३० ते १.३० आणि दुपारी २.३० ते ३.३० अशा तीन टाइम स्लॉट्समधून राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. एका स्लॉटमध्ये २५ जणांना परवानगी आसणार आहे.
तर वस्तू संग्रहालय हे मंगळवार ते रविवार असे आठवड्यातून सहा दिवस सुरु असणार आहे. सकाळी ९.३० ते ११.००, सकाळी ११.३० ते १, दुपारी १३.३० ते ३.०० आणि दुपारी ३.३० ते ५.०० या चार टाइम स्लॉट्समध्ये त्याला भेट देता येणार आहे. एका टाइम स्लॉट्समध्ये ५० जणांना परवानगी असणार आहे.